Goa Politics: विद्येच्‍या प्रांगणात राजकारण नकोच!

‘सेंट झेवियर्स’मधील ‘अभाविप’चा धुडगूस आक्षेपार्ह : आमदार कार्लुस फेरेरा, आमदार ज्योशुआ यांचे मत
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न असलेल्या काही विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता.21) म्हापशातील सेंट झेवियर्स कॉलेज कॅम्पसमध्ये घुसखोरी करीत तेथील चालू वर्ग बंद पाडले व धुडगूस घातला. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या आंदोलनात कथितरित्या सहभागी होण्यास चिथवण्याचा प्रयत्न केला.

या धुडगूसमुळे कॉलेज प्रशासन व अभाविपमध्ये दिवसभर प्रखर संघर्ष दिसला. त्‍यावर जनमानसातून पडसाद उमटत असून विद्येच्‍या प्रांगणात राजकारण नको, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत. आमदार ज्‍योशुआ डिसोझा, आमदार कार्लुस फेरेरा यांनी शांततेचा कुणीही भंग करू नये, असे म्‍हटले आहे.

शाब्दिक युक्तिवाद

या कथित गैरवर्तनामुळे अभाविपच्या विद्यार्थ्यांनी सेंट झेवियर्सच्या प्रशासन तसेच प्राध्यापकांना वेठीस धरीत जेरीस आणले. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप तसेच विचारधारांवरून शाब्दिक युक्तिवाद रंगले होते. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी म्हापसा पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. विद्यार्थ्यांचे धरणे आंदोलन असल्याने पोलिसही थोडेस हतबल दिसले. कारण थेट कारवाई केल्यास विपरित परिणामांना पोलिसांनाच तोंड द्यावे लागले असते. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी दंडाधिकाऱ्यांना पाचारण करावे लागले.

चालू वर्ग केला खंडित

सकाळी 10.30च्या सुमारास कॉलेज कॅम्पसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेच्या काही विद्यार्थ्यांचा गट कथितरित्या घुसला. त्यांच्यासोबत सेंट झेवियर्स कॉलेजचा सरचिटणीस तथा विद्यार्थी साहिल महाजन व कॉलेज विद्यार्थी परिषदचे काही विद्यार्थी होते. सुरवातीस या संघटनेने कॉलेजमध्ये घुसून वर्गात तसेच इतर ठिकाणी जाऊन घोषणाबाजी देण्यास सुरवात केली. अभाविपी व साहिल महाजन यांनी चालू वर्गातील क्लास खंडित करण्याचा प्रयत्न केला. आम्ही हा लढा विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढतोय, असे त्यांचे म्हणणे होते.

Goa Politics
Water Supply Shortage : गोव्यात 'या' ठिकाणी पाणीपुरवठा असणार मर्यादित

..आणि झाली घोषणाबाजी

कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांचे प्रश्न व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यापासून वंचित ठेवताहेत. त्यामुळे आमच्या आंदोलनास पाठिंबा देत आमची साथ द्यावी. आणि यासाठीच हा उठाव असल्याचे कॉलेज जीएस साहिल महाजनाचे म्हणणे होते. नंतर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसच्या मधोमध जमून कॉलेज प्रशासन व व्यवस्थापनविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरवात केली.

Goa Politics
Gomantak-Sakal Drawing competition: गोव्यात 25 हजार बालचित्रकार

रस्‍त्‍यावर मांडला ठिय्‍या

संबंधितांनी हातात अभाविपचे झेंडे घेत कॅम्पसमधील रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर कॅम्पसमधील चित्र बदलले. कॅम्पसच्या चौबाजूने विद्यार्थी जमा होऊ लागले. या स्थितीचे गांभीर्य ओळखून कॉलेज प्रशासनाने मुलांना घरी जाण्यास सांगितले व कॉलेजच्या सर्व एण्ट्री व एक्झिट पाईंट बंद केल्या. जेणेकरून आणखीन बाहेरून कुणीही शिरकाव करु नये.

Goa Politics
Fraud Case: एक हजार गुंतवणूकदारांना 7 कोटींचा गंडा

विचारधारेवरून बाचाबाची

या प्रकारामुळे कॉलेज प्रशासन व संघटनेमध्ये बाचाबाची होऊन संघर्ष पेटला. त्यानंतर अभाविपचे प्रतिनिधी व साहिल महाजन हे कॉलेज कॅम्पसच्या मधोमध धरणे आंदोलनास बसले. कॉलेज प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अभाविपचे सदस्य नंतर प्रशासकीय इमारतीच्या ब्लॉकमध्ये दाखल झाले.

तिथे पोलिसांकडून संघटनेला रोखून धरले. यावेळी कॉलेजचे इतर प्राध्यापक व अभाविपच्या सदस्यांमध्ये बराच वेळ विचारधारेवरून बाचाबाची झाली असता पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संबंधित प्रकार हा शैक्षणिक संकुलातील वातावरणास शोभणारा नव्हता.

Goa Politics
Water Transport: जलवाहतूक सुलभ बनवण्याच्या दृष्टीने नवीन फेरी धक्के- सुभाष फळदेसाई

...नंतर विषय ताणत गेला

विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीमुळे कॉलेजमधील वातावरण दिवसभर तंग राहिले. अभाविपने प्राचार्यांची भेट मागितली. प्राचार्यांना भेटायचे नसल्यास वरील मंडळाची स्थापन कधी करणार ती तारीख सांगा. आम्ही येथून जातो असा संबंधितांचा पवित्रा. मात्र कॉलेज प्रशासनाचा अभाविपस प्रतिसाद मिळाला नाही व हा वाद ताणला. अभाविपच्या दाव्यानुसार याविषयी कॉलेज प्रशासनास पाचवेळा निवेदन देण्याचा प्रयत्न; परंतु संबंधितांकडून अपेक्षित प्रतिसाद नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com