मुसळधार पावसातही डॉक्टरांची सेवा

प्रतिनिधी
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

दाबे - सत्तरी गाव कंटेनन झोनमध्ये दोन दिवसांअगोदर समाविष्ठ केल्यानंतर वाळपई आरोग्य केंद्रातर्फे दाबे गावात सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही शनिवारपासून हाती घेण्यात आली आहे.

वाळपई: दाबे - सत्तरी गाव कंटेनन झोनमध्ये दोन दिवसांअगोदर समाविष्ठ केल्यानंतर वाळपई आरोग्य केंद्रातर्फे दाबे गावात सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही शनिवारपासून हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून वाळपई भागात संततधार पाऊस पडत असूनदेखील भर पावसात आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी अर्थातच कोविड योद्ध्यांची अविरतपणे सेवा सुरू आहे. 

दाबे गावात साठहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. कंटेन्मेंट झोनमुळे दाबे गावातील लोकांना बाहेर पडता येत नाही. दाबे गावातील सुमारे १२० घरातील प्रत्येक लोकांची तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 

दाबे गावातील वाढती कोरोनाची प्रकरणे चिंताजनक बनली आहेत. वाळपई आरोग्य केंद्राचे आरोग्यधिकारी डॉ. श्याम काणकोणकर, डॉ. अभिजीत वाडकर, अकीब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड योध्दे कर्मचारी कविता गावस, अलिशा भट, श्वेता मांद्रेकर, दीपा गावडे, रोशन गावस, अक्षदा आदी सेवा बजावत आहेत. प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. 

संबंधित बातम्या