Smriti Irani Case : ‘सिली सोल्स’प्रकरणी मागविली कागदपत्रे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भातील कथित वादग्रस्त बार आणि रेस्टॉरंट ‘सिली सोल्‍स’बाबत सात दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश बार्देश गटविकास अधिकारी (बीडीओ) शिवप्रसाद नाईक यांनी आसगाव पंचायत सचिवांना दिले आहेत.
Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Silly Souls Café and Bar | Smriti IraniDainik Gomantak

म्हापसा : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासंदर्भातील कथित वादग्रस्त बार आणि रेस्टॉरंट ‘सिली सोल्‍स’बाबत सात दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश बार्देश गटविकास अधिकारी (बीडीओ) शिवप्रसाद नाईक यांनी आसगाव पंचायत सचिवांना दिले आहेत. यासंदर्भात बीडीओ नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पंचायत सचिवांना सात दिवसांत कागदपत्रे देण्यास सांगितले असल्याची पुष्टी केली.

Silly Souls Café and Bar | Smriti Irani
Adv. Ramakant Khalap Interview : भाजपने मगोला पद्धतशीरपणे संपवले!

प्राप्त माहितीनुसार, 27 जुलै रोजी पंचायत संचालनालयाच्या बीडीओ मुख्यालयाने आसगाव येथील कथित वादग्रस्त बार आणि रेस्टॉरंट ‘सिली सोल्‍स’बाबत अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखल केलेल्या तक्रारीची माहिती जाणून घेण्यासाठी आणि गोवा पंचायतराज अधिनियम 1994 नुसार, आवश्यक कारवाई करण्यासाठी बार्देश गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार, आता बीडीओंनी आसगाव पंचायत सचिवांना या रेस्टॉरंटसंदर्भात पंचायतीकडे उपलब्ध सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com