देशांतर्गत विमान, रेल्वेसेवा सुरू व्हावी : सावियो मेसिएस

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

 गोव्यात पर्यटक येऊ लागले असले तरी मोठ्या संख्येने पर्यटक येण्यासाठी महत्त्वाची असणारी देशातर्गत असणाऱ्या विविध शहरांतील विमान आणि रेल्वे सेवा सुरू होणे अपेक्षित असल्याचे मत  ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे  (टीटीएजी) अध्यक्ष सावियो मेसिएस यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

पणजी: गोव्यात पर्यटक येऊ लागले असले तरी मोठ्या संख्येने पर्यटक येण्यासाठी महत्त्वाची असणारी देशातर्गत असणाऱ्या विविध शहरांतील विमान आणि रेल्वे सेवा सुरू होणे अपेक्षित असल्याचे मत  ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे  (टीटीएजी) अध्यक्ष सावियो मेसिएस यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

सध्या राज्यात पर्यटन खात्याकडे ६५० च्या सुमारास हॉटेल नोंदीत झाले आहेत. बुकिंग केल्याशिवाय पर्यटक येत नाहीत, ही चांगली बाब आहे. परंतु सीमा खुल्या झाल्याने जवळचा पर्यटक सध्या गोव्यात येत आहे. परंतु सीमा खुल्या होण्यास एकच आठवडा होत आल्याने आलेल्या पर्यटकांवरून पुढचा अंदाज बांधणे अशक्य आहे. 

अनेक राज्यात कोरोनाचा परिणाम त्यातच पावसाचाही फटका बसला आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ते लोक स्वतःच्या वाहनाने येऊ शकतात. पण महत्त्वाची बाब म्हणजे देशांतर्गत काही ठिकाणची विमान सेवा सुरु आहे. गुजरात मधील पर्यटक यायचा झाल्यास त्याला तेथून विमान उपलब्ध नाही. त्यासाठी विविध शहरांना जोडणारी विमान सेवा सुरुळीत सुरु झाल्यास आणि रेल्वेसेवेद्वारे देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येईल आशा आहे . पुढील आठवड्यात रेल्वेच्या गाड्या सुरु होत आहेत, त्यातून लगेच पर्यटक येतील हे सांगता येणार नाही. अनेक लोकांच्यात भीती आहे. ही भीती जाण्यासाठी दोन तीन महिने जातील, असे मेसिएस म्हणाले.

या महिन्यांत पर्यटक वाढण्याची शक्यता कमी वाटते, पण डिसेंबरपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत  ५० टक्क्यांपर्यंत देशी पर्यटक राज्यात येईल, अशी आशा आहे.

संबंधित बातम्या