महाविद्यालायच्या मागच्या दहा वर्षातील प्रगतीमुळे अभिमान; संचालक फा. किन्ले डिक्रुझ

डॉन बॉस्को (Don Bosco) अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेची दशकपुर्ती
महाविद्यालायच्या मागच्या दहा वर्षातील प्रगतीमुळे अभिमान; संचालक फा. किन्ले डिक्रुझ
संचालक फा. किन्ले डिक्रुझDainik Gomantak

फातोर्डा सेलेसियन सोसायटी संचालित डॉन बॉस्को (Don Bosco) अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना 2011 साली झाली. यंदा महाविद्यालय स्थापनेची दशकपुर्ती (Decades) पुर्ण करीत आहे. या दहा वर्षांत महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना मुल्यावर आधारीत शिक्षण दिले जात आहे. या दहा वर्षांत जे विद्यार्थी पदवीधर झाले त्या सर्वांनी जिवनात यशस्वी उंची गाठली आहे. म्हणुनच या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असुन केवळ गोव्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थीही या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आकर्षित होत आहेत. दहा वर्षातील महाविद्यालयाच्या प्रगतीमुळे अभिमान वाटत असल्याचे संचालक फा. किन्ले डिक्रुझ (Director Fa. Kinley D'cruz) यानी दशकपुर्ती वर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. निना पाणंदीकर, मॅकानिक्स विभागाचे प्रमुख अजित साळुंके, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. मॅकानिकल,इलॅक्ट्रोनिक्स व टेलेकोम्युनिकेश, सिव्हिल इंजिनियरींग व संगणक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी स्वता तयार केलेल्या अनेक प्रकल्पांचे प्रदर्शन भरविले असुन ते पत्रकारांना दाखविण्यात आले व माहिती देण्यात आली.

गेल्या दहा वर्षात महाविद्यालय व्यवस्थापनाने देश विदेशातील अनेक नामांकीत संस्थाकडे भागीदारी साधली असुन औद्योगीक कंपन्यांकडेही चांगले संबंध प्रस्थापित केल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह योग्य शिक्षण देणे शक्य झाले असुन वेगवेगळ्या विषयातील शिबिरे, कार्यशाऴा, संमेलने आयोजित करुन विद्यार्थ्यांना आधुनिक जगताची ओळख करुन देणे व व्यावसायिक अभ्यासात प्राविण्य मिळवुन देणे महाविद्यालयाला शक्य झाले आहे. तसेच विविध प्रकारचे वेबिनार आयोजित करुन प्रसिद्ध अशा मान्यवरांकडुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे शक्य झाले आहे. असे 2016पासुन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निना पाणंदीकर यानी सांगितले.

संचालक फा. किन्ले डिक्रुझ
ACGL कंपनीचे कर्मचारी 18 ऑक्टोबरला जाणार संपावर

विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपुर्ण व उद्योगीक महत्वाचे कौशल्यपुर्ण शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करीत आहे. महाविद्यालयात अत्याधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळा, सेमिनार सभागृहे व इतर अनेक साधन सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयाने आयआयटी गोवा, एफआयसीसीआय, पीडबल्यूडी, परसिसटंट, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्या व अमेरिका, सिंगापुर, भुतान येथील विद्यापीठाकडे सामंजस्य करार करुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जास्तित जास्त भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या असे पाणंदीकर यानी सांगितले.

महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग पात्र असुन त्यामध्ये 11 शिक्षक डॉक्टरेट पदवी प्राप्त व अनुभवी आहेत. काही शिक्षक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहेत. डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यापीठ स्तरावर अनेक पारितोषिके व पदके मिळवली असुन गोवा विद्यापिठाकडुन 5 सुवर्ण पदकांचा समावेश त्यात आहे.अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, क्रिडा या संदर्भात ही प्राविण्य मिळवुन देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर केंद्र स्थापण्याची तसेच आणखी पुष्कळ विदेशी विद्यालाकडे संबंध जोडण्याच्या योजना व्यवस्थापनाच्या विचाराधीन आहेत असे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.