सरकारच्या हातचे बाहुले बनू नका; राज्य निवडणूक आयुक्तांना गोवा फाॅरवर्डचा इशारा

Dont become the arm of the government Goa Forwards warning to the State Election Commissioner
Dont become the arm of the government Goa Forwards warning to the State Election Commissioner

मडगाव:(Dont become the arm of the government Goa Forwards warning to the State Election Commissioner) निवडणूक मुक्त व निकोप पद्धतीने व्हाव्यात यासाठी निवडणूक होणाऱ्या सर्व पालिकांच्या मतदानाचा निकाल एकत्र जाहीर करण्यात यावा अशी मागणी गोवा फाॅरवर्डने राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. या पदावर नव्याने नियुक्त झालेले डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी सरकारच्या हातचे बाहुले बनू नये असा इशाराही गोवा फाॅरवर्डने दिला आहे.   

निवडणुकीची अधिसूचना अध्याप जारी न झालेल्या पाच पालिकांसाठी मतदान होईपर्यंत उद्या होणाऱ्या सहा पालिकांची मतमोजणी हाती घेऊ येऊ नये अशी मागणी गोवा फाॅरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.  यावेळी आधीच्या राखीवता अधिसूचनेच्या विरोधात याचिका दाखल  केलेले याचिकादार रुमाल्द फर्नांडिस, फौजिया शेख व गोवा फाॅरवर्डचे फातोर्डा गट समितीचे अध्यक्ष सुजय लोटलीकर उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेले  डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती  यांनी सरकारच्या हातचे बाहुले न बनता घटनेच्या तत्वांचे पालन करावे असे आवाहन कामत यांनी  केले. (Dont become the arm of the government Goa Forwards warning to the State Election Commissioner)

पालिका निवडणूक पक्ष पातळीवर होत नसली तरी राजकीय पक्षांचे समर्थन लाभलेल्या पॅनलनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आधी मतदान होणाऱ्या सहा पालिकांच्या निकालाचा नंतर होणाऱ्या पाच पालिकांच्या निकालावर परिणाम होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी दोन्ही टप्प्यात होणाऱ्या पालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच वेळी हाती घ्यावी अशी मागणी कामत यांनी केली.

या पदावर नव्याने नियुक्त झालेले रमणमूर्ती यांनी सरकारच्या हातचे बाहुले असल्यासारखे वागू नये. मागचे राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग हे सरकारचे एजंट असल्यासारखे वागले तेव्हा सर्वोच्च न्यायलयाला हस्तक्षेप करावा लागला, याची जाणीव रमणमूर्ती यांनी ठेवावी, राज्य निवडणूक आयुक्तांनी पुन्हा सरकारचे बाहुले असल्यासारखे वर्तन केल्यास गोवा फाॅरवर्ड व याचिकादारांनी न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला ठेवला आहे, असा इशारा कामत यांनी दिला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com