माजी मंत्र्याचे बेकायदेशीर पाप माझ्या माथी मारु नका: मुख्यमंत्री सावंत

त्या मालकाशी या बांधकामासाठीचे कायदेशीर परवाने व कागदपत्रे आहेत असे एैकिवात आहे.
Chief Minister
Chief MinisterDainik Gomantak

फातोर्डा : ओल्ड गोवा येथे ज्या कथीत बेकायदेशीर बांधकामाबद्दल आंदोलन चालु आहे त्याच्याशी आपल्या सरकारचा किंवा भारतीय जनता पक्षाचा काडीचाही संबंध नाही. ज्या जागेवर बांधकाम सुरु आहे ती खाजगी जागा आहे. ही जागा त्याचे ज्या मालकाने विकत घेतली आहे त्याचे राजकीय पक्षाशी संबंध आहेत. तो मालक हा एका माजी मंत्र्याचा मित्र आहे. त्यांचे एकमेकांबरोबर उठणे-बसणे असते शिवाय या दोघांचे एकत्र किती तरी फोटो किंवा व्हिडिओ पण आहेत. त्या मालकाशी या बांधकामासाठीचे कायदेशीर परवाने व कागदपत्रे आहेत असे एैकिवात आहे.

Chief Minister
डिचोलीतील 'त्या' उर्वरित घरांविरोधात कारवाई, अन्य घरेही जमीनदोस्त

याची चौकशी करण्याचे आदेश आपण नगर नियोजन व पंचायत खात्याला दिले आहेत. जर हे बांधकाम बेकायदेशीर असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल.त्यामुळे या माजी मंत्र्याचे बेकायदेशीर पाप माझ्या माथी मारु नका असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister) (Dr. Pramod Sawant) यांनी मडगावी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आपले सरकार बेकायदेशीर कामांना कधीही परवानगी दिलेली नाही व देणारही नाही. ज्यानां हे बांधकाम मोडायचे असेल, जे आंदोलन करीत आहेत, त्यानी अधिकृतपणे तक्रार करावी. त्यामुळे सरकारलाही कारवाई करणे शक्य होईल व सोपे जाईल. केवळ एक बाजु एैकुन सद्या आमची चौकशी प्रक्रिया चालू आहे. केवळ वर्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मि़डियावरुन आरोप करणे योग्य नव्हे असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले.

Chief Minister
गिरीष चोडणकरांचा गाडेधारकांच्या उपोषणाला पाठींबा

या आंदोलना संबंधी मंत्री मायकल लोबो यांच्या भुमिकेबद्दलच्या विचारलेल्या प्रश्र्नांला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मंत्र्यांना कायदा समजला पाहिजे व जी परिस्थिती आहे ती समजुन घ्यायला हवी एवढेच ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com