Third Wave of Corona

Third Wave of Corona

Dainik Gomantak 

28 डिसेंबर पासून तिसरी लाट सुरू; लोकांनी कोणत्याही पक्षांच्या जाहीर सभेला जाऊ नये: डॉ. आयरा आल्मेदा

राज्यातील कोविड पॉझिटिव्हिटी दर 13.89 टक्के इतका आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान गोव्यातील नागरीकांनी कोणत्याही पक्षांच्या जाहीर सभेला जाऊ नये. याउलट स्वत:चे कोरोनापासून रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

Third Wave of Corona: नवीन वर्षाच्या स्वागतानंतर राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी तज्ज्ञांनी सरकारला नाईट कर्फ्यू (Night Curfew) लावण्यासंदर्भात आवाहन केले होते. पण अद्याप तरी याबाबत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. पण याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

<div class="paragraphs"><p>Third Wave of Corona</p></div>
गोव्याचे पर्यावरण आणि समृद्ध संस्कृती धोक्यात

एकीकडे सरकारने लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवला असला तरी दुसरीकडे कोरोना (Corona) रुग्णसंख्याही तितक्याच झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळेच आरोग्य संचालक डॉ. आयरा आल्मेदा यांनी जनतेशी संवाद साधून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

गोव्यात 28 डिसेंबर पासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. राज्यातील कोविड पॉझिटिव्हिटी दर 13.89 टक्के इतका आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान गोव्यातील नागरीकांनी कोणत्याही पक्षांच्या जाहीर सभेला जाऊ नये. याउलट स्वत:चे कोरोनापासून रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com