भूमिपुत्रांना गृहीत धरू नका!

Don't take Bhumiputra for granted
Don't take Bhumiputra for granted

 डणे : मोप विमानतळाच्या बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या मेगा व्हाइड कंपनीने पेडणे पोलिस स्‍थानकात दिलेल्या खोट्या तक्रारीच्या आधारावर मोप विमानतळ संघर्ष समितीच्या तीन सदस्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उगवे येथे निषेध सभा झाली. या सभेत  मेगा व्हाइड कन्स्ट्रक्शन कंपनी, पेडणे पोलिस व सरकारचा निषेध करण्यात आला. यापुढे स्थानिकांचा आवाज दडपण्‍याचा प्रयत्न केल्यास तो संघटितपणे मोडून काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्‍थांच्‍या सभेतून देण्‍यात आला.

पंचायत सदस्य प्रसाद महाले म्हणाले की, मोपा विमानतळ हा गाव व तालुक्याला वरदान ठरेल, अशी अपेक्षा होती. पण हा  विमानतळ म्हणजे शाप ठरत असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. कंत्राटदार कंपनी व दोन कर्मचारी यांची परस्परविरोधी तक्रार असताना पोलिस तिघांवर गुन्हा नोंद करून एकतर्फी कारवाई करतात. कंपनीच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारीची दखल का घेत नाहीत. कुणाच्या दवाबामुळे हे होते, असे प्रश्‍‍न यावेळी उपस्‍थित करण्‍यात आले. 


माजी उपसरपंच संतोष महाले म्हणाले की, या विमानतळासाठी आमच्या शेती, काजू बागायतींच्या जमिनी गेल्या. लोकांची उपजीविकेची साधने गेली. वरून कोण कुठून तरी आलेले कंपनीचे लोक आम्ही कसे वागावे व काय करावे, ते आम्हाला शिकवितात. खोट्या तक्रारी देऊन आमच्या लोकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. आम्ही या प्रकाराचा जाहीर निषेध करतो.


माजी सरपंच दशरथ महाले म्हणाले की, गावच्या युवकांना विमानतळामुळे गावातच रोजगार मिळेल म्हणून लोकांनी आपल्या जमिनी देऊन त्‍याग केला. पण विमानतळाचे काम नुकतेच सुरू झाले आणि एवढ्यातच दडपशाही सुरू झाली. यापुढे काय होईल. मात्र, जनता हे सहन करणार नाही, असा इशारा दिला.


अनंत महाले म्‍हणाले की, पोलिस कारवाई करण्‍यास भाग पाडलेल्‍या घटनेचा निषेध करतो. मेगा व्हाइड कन्स्‍ट्रक्‍शन कंपनी, पोलिस व सरकारवर जोरदार टीका करून पुढे म्‍हणाले, की, यापुढे अशा घटना घडल्यास लोक संघटितपणे हा अन्याय मोडून काढतील. विमानतळ प्रकल्पाची झळ बसणाऱ्या गावात जनजगृती करून लढा देऊ. यावेळी वामन महाले, बबन महाले आदींची भाषणे होऊन त्यांनी घटनेचा निषेध केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com