पणजी: देशात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. गोव्यात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचीसक्ती असून स्थानिक तसेच पर्यटकही तोंडाला मास्क न लावताच फिरतात. मास्क न लावलेल्यांना १०० रुपये दंड आकारण्यात येतो, तरीही काहीजण जाणुनबुजून तो वापरत नाहीत. त्यामुळे यापुढे ही दंडाची रक्कम दुप्पट (२०० रुपये) करण्यात येत असून ती उद्यापासून (२४ नोव्हेंबर) लागू केली जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
राज्यात पर्यटन क्षेत्र खुले करण्यात येऊन पर्यटकांना येण्यासाठी मोकळीक देण्यात आली. मात्र, कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्वांनाच सक्तीचे आहे. पोलिस, मामलेदार, पालिका मुख्याधिकारी व पंचायत सचिवांना मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई
करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, सुरक्षित अंतर, मास्क घालत नाही.
त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभवू शकतो. इतर राज्यांत कोविडचे प्रमाण वाढू लागले आहेत. विविध राज्यातून गोव्यात पर्यटक येत आहेत. त्यामुळे कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुप्पट दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दंडात्मक कारवाईचे अधिकार ज्यांना देण्यात आले आहेत, त्यांनी कठोर कारवाई करण्यास सुरवात करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज पोलिस मुख्यालयातील कार्यक्रमावेळी बोलताना केले.
राज्यात कोविडचे प्रमाण कमी झाल्याने स्थानिक लोक तसेच पर्यटक बेफिकिरपणे वावरत आहेत. मार्केट, समुद्रकिनारे तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये गर्दी करू लागले आहेत. प्रवासी बसेसमधूनही प्रवाशांची गर्दी असते. कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही. लोक गटागटाने एकत्र उभे राहत आहेत. पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे (एसओपी) पालन करण्याचा पूर्ण फज्जा उडाला आहे. गोव्यात कोरोना संसर्ग तसेच मृत्यूचे प्रमाण या महिन्यात बरेच कमी झाले आहे, मात्र पर्यटकांच्या या बेशिस्तीमुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नवी पोलिस इमारत बांधकाम लवकरच
पोलिस मुख्यालयातील आतील जागेत नव्या इमारतीच्या बांधकामाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. पोलिस खात्यात सुमारे १२०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. काही प्रमाणात गृहरक्षकांच्याही जागा भरायच्या आहेत. येत्या १ डिसेंबरपासून सर्व खात्यामध्ये नोकरभरतीच्या प्रक्रियेला सुरवात होईल. पोलिस खात्याचा दर्जाही सुधारेल व त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळही उपलब्ध होईल.
आणखी वाचा:
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.