Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेबांचे विविध क्षेत्रांत योगदान

विशांत नाईक : बेतकी-खांडोळा पंचायतीत विशेष कार्यक्रम
Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary
Dr. Babasaheb Ambedkar Birth AnniversaryDainik Gomantak

खांडोळा : भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेबांनी विविध क्षेत्रांत चौफेर योगदान दिले. बहुजन समाजाला बळ दिले, त्यांच्या दूरदृष्टीमुळेच सामाजिक बदल झाले. त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असून त्यानुसार वागले पाहिजे, असे मत बेतकी-खांडोळा पंचायतीचे सरपंच विशांत नाईक यांनी व्यक्त केले.

यावेळी खांडोळा पंचायतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विशेष कार्यक्रमानुसार साजरी करण्यात आली. यावेळी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सरपंच, पंच व ग्रामस्थांतर्फे परिसरातील कचरा गोळा करण्यात आला.

Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: मामुटीला वाटलं समोर बाबासाहेब उभे आहेत..मेक-अप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी सांगितलेला तो किस्सा..

यावेळी पंच रमिता गावडे, पंच मनोज गावकर, मधू गावकर, सचिव रूपेश हळर्णकर, उमेश नाईक, विनित कुंडईकर, शर्मिला कुंडईकर, रमाकांत नाईक, रोहन देसाई, शुभम नाईक, मालकुम गावकर, पुतू घाडी, बापू रायमाने, ‘गोमन्तक’चे उपसंपादक संजय घुग्रेटकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मधू गावकर म्हणाले, बाबासाहेबांची मौलिक शिकवण आजही उपयोगी असून प्रत्येकाने शिकले पाहिजे.

Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary
बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी | Babasaheb Ambedkar Jayanti Celebrated | Gomantak Tv

‘डीडीएसएसवाय’चे नूतनीकरण

बेतकी - खांडोळा पंचायतीतर्फे लवकरच ‘डीडीएसएसवाय’ कार्डे नूतनीकृत करण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच ती सुविधा पंचायतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती सरपंच विशांत नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com