हॉस्पिसिओच्या डॉ. वेंकटेश यांचा व्हॉट्सॲप व्हिडिओ व्हायरल

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 5 मे 2021

व्हेंटीलेटर्स खरेदीच्या घोटाळ्याची चौकशीसाठीची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेण्याची मागणी करणार असल्याची माहिती देणारा व्हिडिओ डॉ. वेंकटेश यांनी व्हॉट्सॲपवर स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

पणजी: आरोग्यमंत्र्यांनी काही लोकांना पाठवून हॉस्पिसिओ(Hospicio) इस्पितळात सुरू असलेले डायलिसिस युनिट त्वरित स्थलांतर करण्याची ताकीद दिली. त्यांनी लेखी तशी नोटीस दिल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल तसेच प्रलंबित असलेल्या अर्जात व्हेंटीलेटर्स खरेदीच्या घोटाळ्याची चौकशीसाठीची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेण्याची मागणी करणार असल्याची माहिती देणारा व्हिडिओ डॉ. वेंकटेश(Dr. Venkatesh) यांनी व्हॉट्सॲपवर स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.(Dr of Hospicio in Goa Venkateshs WhatsApp video goes viral)

गोवा: राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा 

या डायलिसिस युनिटमध्ये 60 रुग्ण डायलिसिस घेत आहेत.  केंद्र सरकारने राज्याला वेंटीलेटर्स खरेदीसाठी पंतप्रधान केअर निधीतून 55 कोटी रुपये मंजूर केले आहे. दिल्लीतील केंद्र सरकारने जर 2 लाख रु. प्रति वेंटीलेटर्स या दराने खरेदी केले तर तेच वेंटीलेटर्स आरोग्यमंत्र्यांनी 8.5 लाख प्रति या दराने खरेदी केले. प्रत्येक वेंटीलेटर्समागे 6.5 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. गोव्याने जे वेंटीलेटर्स खरेदी केले त्याची मूळ किंमत 2 लाख रुपये आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या जनहित याचिकेत केली आहे. याचिकेत सादर केलेले पुरावे हे ‘कॅग’ अहवालात सादर केलेल्याच्या आधारे आहेत. यापूर्वी आरोग्य घोटाळ्यात मोठमोठे राजकारणी गजाआड झाले आहेत, असे त्यांनी व्हिडिओमध्ये बोलताना म्हटले आहे. 

आरोग्यमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या वादाचा गोवा आरोग्य सेवेला फटका 

200 वेंटीलेटर्स खरेदी करून मोठ्या प्रमाणात आरोग्य खात्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यासंदर्भातची जनहित याचिका मी सर्वोच्च न्यायालयात दाखल करून सीबीआयची चौकशी मागितली आहे. आरोग्य खात्यात सुमारे 200 कोटीचा गैरवापर झाला आहे. काल आरोग्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून काही व्यक्ती हॉस्पिसिओ इस्पितळातील डायलिसिस युनिटमध्ये आले व त्यानी हे युनिट त्वरित खाली करण्याचे फर्मावले. आतापर्यंत या युनिटमध्ये 60 व्यक्ती डायलिसिस उपचार घेत असून एकही उपचार घेताना दगावलेला नाही. अडचणीशिवाय या रुग्णांना गेली 18 वर्षे डायलिसिस सेवा देत आहे असे डॉ. वेंकटेश यांना व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

गोव्यात एकाच दिवसात 11 डॉक्टरांना कोरोनाची लागण 

हॉस्पिसिओतून काढल्याने आरोप
हॉस्पिसिओ इस्पितळातील डायलिसिस युनिटचे डॉ. वेंकटेश यांनी व्हिडिओद्वारे केलेले सर्व आरोप खोटारडे आहेत. डॉ. वेंकटेश यांचे हॉस्पिसिओ इस्पितळ येथे त्यांचे डायलिसिस युनिट होते तेथून हलविण्यात आल्याने त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या