वैद्यकीय संघटनेच्या राष्ट्रीय समितीवर गोव्याचे डॉ. जगदीश काकोडकर

अवित बगळे
रविवार, 9 ऑगस्ट 2020

संघटनेच्या आओ गांव चले राष्ट्रीय समितीची हल्लीच फेररचना करण्यात आली असून त्या समितीवर डॉ. काकोडकर यांना सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे.

पणजी

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील डॉ. जगदीश काकोडकर यांची भारती वैद्यकीय संघटनच्या (आयएमए) एका राष्ट्रीय स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेच्या आओ गांव चले राष्ट्रीय समितीची हल्लीच फेररचना करण्यात आली असून त्या समितीवर डॉ. काकोडकर यांना सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी आओ गांव चले समितीवर डॉ. काकोडकर यांची नियुक्ती करीत असल्याचा आदेश जारी केला आहे. या समितीचे अध्यक्ष केरळ येथी डॉ.जोसेफ मणी असून अन्य पाच सदस्‍यांत डॉ. काकोडकर यांचा समावेश आहे.
डॉ. काकोडकर हे गोमेकॉच्या प्रतिबंधात्मक आणि समाजिक औषधे विभागाचे प्रमुख आहेत. संघटनेत गेली तीन दशके राज्य पातळीवर ते कार्यरत असून गोव्यात आओ गांव चले समितीद्वारे त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाची दखल घेतली गेली आहे. आयएमएतर्फे देण्यात येणारे उत्कृष्ठ सचिव, अध्यक्ष म्हणून पुरस्कार त्यांना याआधी प्राप्त झाले असून युवकांना मार्गदर्शन करणे, नेत्रदीप योजना, कर्करोग जागृती उपक्रम राबवले आहेत. कोरोना विषयक जागृती पुस्तिका ( इ हँडबुक) काढण्यात त्यांनी व त्यांच्या विभागातील डॉक्टरांनी हातभार लावला आहे. अन्य माध्यमातून ते कोरोनासंदर्भात जागृतीचे काम करीत आहेत.

संबंधित बातम्या