'सरकार तुमच्या दारी' हा समाजाला जोडणारा उपक्रम

या ठिकाणी उभारलेल्या 25 विविध खात्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि सरकारी योजनांची (Government scheme) माहिती व्यवस्थित लोकांना समजावून सांगण्याची सूचना केली.
'सरकार तुमच्या दारी' हा समाजाला जोडणारा उपक्रम
गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवरDainik Gomantak

दाबोळी: 'सरकार तुमच्या दारी' हा समाजाला जोडणारा उपक्रम असून यात कोणताही राजकीय हेतू नाही. प्रत्येकांच्या घरात सरकारी योजना बरोबर त्यांची शासकीय कामे पुढे घेऊन जाण्याचे स्वप्न स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. गोवा मुक्तिची (Liberation of Goa) 60 वर्षे पूर्ण होत असताना देशाच्या अमृतमहोत्सवी (Nectar Festival) वर्षानिमित्त राज्याला कृषी विज्ञान शिक्षण विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कौशल्य भारताचे स्वप्न पूर्ण करणे एकमेव ध्येय राज्य सरकारने बाळगलेले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले.

'प्रशासन आपल्या दारात' हा निवडणुकीचा स्टंट नसून केंद्र सरकारची आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविलेला उपक्रम आहे. आपल्या मुख्यमंत्रिपदाला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत आणि कोविड (Covid 19) महामारीने खऱ्या अर्थाने आमचे डोळे उघडले आहेत, असे सांगून, लाल फितीत अडकलेल्या फाईल्सना चालना देण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांतील 'प्रशासन तुमच्या दारी' या कार्यक्रमा दरम्यान बोलताना स्पष्ट केले.

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर
Goa: सरकारी महामंडळांनी आत्मनिर्भर व्हावे - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत:

मुरगाव तालुक्यातील वास्को,मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळी अशा चारही मतदारसंघातील जनतेसाठी ते झुआरीनगरातील MES कॉलेजच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते संबोधित करताना बोलत होते. यावेळी भव्य अशा वास्तूत गोव्याचे संपूर्ण प्रशासन मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघातील लोकांना मदत करण्यासाठी उपस्थित होते. या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमासाठी गोव्याच्या विविध अशा 25 खात्यांचे प्रमुख हजर आणि त्या त्या खात्यासंबंधीची माहिती देण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र असे स्टॉल उघडण्यात आले होते. या कार्यक्रमाचे समई प्रज्वलित करून मुख्यमंत्री सावंत यांनी उद्घाटन केले.

व्यासपीठावर यावेळी मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो,वास्कोचे आमदार कार्लुस अल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिका कटियाल उपस्थित होत्या.तसेच उपक्रमात मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कार्यालय, मुरगाव नगरपालिका प्रशासन, मुरगाव गटविकास अधिकारी वर्ग, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरण कार्यालय, तालुक्यातील पाचही गृह विभागाची कार्यालये, वास्को आयकर विभाग, अबकारी कार्यालय, शहर सर्वेक्षण कार्यालय, तालुक्यातील सर्व पंचायतीतील अधिकारी, नागरि पुरवठा कार्यालय, मुरगाव सहाय्यक वाहतूक संचालक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत भवन इतर शासकीय कार्यालयांचे अधिकारी जनतेच्या सेवेसाठी पूर्ण दिवस उपलब्ध होते.

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर
Goa: राष्ट्रीय महामार्गाविषयी प्रमोद सावंत यांची नितीन गडकरींशी चर्चा

पुढे बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सरकार तुमच्या दारी समाजाला जोडण्याबरोबर सरकारच्या योजना विषयी माहिती जाणून घेण्यासाठी सरकारचा हा उपक्रम आहे. कोरोना महामारीवर सरकारने दोन वर्षे झुंज दिली. त्यात तोक्ते वादळातसुद्धा सरकारने सर्व मदत कार्य जनतेपर्यंत पोचविली. हा उपक्रम सामान्य जनतेच्या चांगल्या कार्यासाठी असून यात 38 सरकारी कार्यालये आपले कार्य तुमच्यासाठी करणार आहे. सरकारने या उपक्रमात युवकासाठी IT, औद्योगिक क्षेत्र, राज्य आर्थिक विकास (Economic development) मंडळाच्या अधिकाऱ्यांना सरकार तुमच्या दारी अंतर्गत येथे पाचारण केले आहे. आजच्या युवकांनी या योजनेतून स्वयंपूर्ण गोवा सरकार करणार याची खात्री मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

राज्यातील 191 पंचायती,(Panchayat), 14 नगरपालिकात (Municipality )जाऊन गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सरकारच्या 152 योजना असून याचा फायदा जनतेने या उपक्रमातून प्राप्त करावा. तसेच 122 नोकऱ्या सरकार ऑनलाइन (Online)माध्यमातून देत असल्याने युवकांनी याचा फायदा उठवावा. पंतप्रधान आवास योजने बरोबर कौशल्य भारत अंतर्गत जनतेने, विविध योजनेचा लाभ घ्यावा असे मुख्यमंत्री सावंत यांनी आवाहन केले.

इतर राज्यातील पक्षांना गोव्यातील जनता कदापि स्वीकार करणार नाही. स्वतःच्या राज्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या पक्षांनी गोव्याला विकसित करणार हे स्वप्न पाहू नये. विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री असताना राज्यात एकही योजना राबवली नाही. कामत यांनी स्वतःची पोळी मात्र स्वतः मुख्यमंत्री असताना योजनेअंतर्गत (scheme) भाजून घेतली. मगोपक्ष रथयात्रा काढून फक्त आपल्यापुरती विकास साधण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जनता असल्या राजकारण्यांना कधीच पाठिंबा देणार नसल्याची माहिती शेवटी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी दिली.

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर
Goa: खाण महामंडळ लवकरच स्थापन करु- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिन:

साधन सुविधांबरोबरच माणसांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. येणाऱ्या तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि लगेच त्याचा अहवाल घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नगर विकास मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी सरकार तुमच्या दारी योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा. जनतेने सरकारी योजना जाणून घेण्यासाठी विविध विभागात जाऊन माहिती घ्यावी. भाजप सरकार जनतेला योजना पुरविणारा पक्ष आहे.

यामुळे राज्यात विकासात कामाबरोबर विविध योजना जनतेपर्यंत पोहचू लागल्या असल्याची माहिती मंत्री नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्य विकास कामात अग्रेसर असल्याची माहिती शेवटी मंत्री नाईक यांनी दिली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो कोविड-19 महामारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने गोव्यात ऑक्सीजन प्लांट उभारला जात आहे.

सरकार तुमच्या दारी उपक्रमाचा जनतेने लाभ घेताना याचा फायदा उत्तरापर्यंत पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली. राज्यात निवडणुकीचे (elections) वारे असल्याने इतर राज्यातील पक्ष येथे अशांती पसरवण्यासाठी आपल्या राज्यातील हजारो युवकांना पाचारण करीत आहे. कारण या पक्षाने आपल्या राज्यात निवडणुकीच्या वेळी फक्त सामान्य जनतेवर अत्याचार माजवला होता. यात त्यांनी महिलावर सुद्धा क्रूरता दाखवलेली आहे. भाजप (BJP) पक्ष गोव्यात अल्पसंख्याकांना घेऊन जाणार असल्याने माझ्यासारख्या व्यक्तीला राष्ट्रीय भाजप कार्यकारिणी नियुक्त केले. येणाऱ्या निवडणुकीत भाजप बहुमताने गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती शेवटी मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले मुखर्जी यांनी काश्मीर मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले

'प्रशासन आपल्या दारी' मुळे झुआरीनगरातील MES कॉलेजचा संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. जवळजवळ तीन हजारांहून जास्त लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. MES कॉलेजच्या आवारात सर्वत्र मुख्यमंत्री तसेच या कार्यक्रमाचे कटआऊट्स लावण्यात आले होते. चारही मतदारसंघातील भाजप मंडळ, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी वावरताना दिसत होते. या कार्यक्रमाला जे लोक आले होते त्यांची नोंदणी करण्यासाठी मतदार संघानुसार कक्ष उभारण्यात आले होते.

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी उभारलेल्या 25 विविध खात्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली आणि सरकारी योजनांची माहिती व्यवस्थित लोकांना समजावून सांगण्याची सूचना केली. नंतर त्यांनी सर्व खात्यातील अधिकाऱ्यांशी (officers) चर्चेला सुरुवात केली.

गोवा मुक्तीचा 60 वा वर्धापनदिनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मान्यवर
COVID19 Goa: लॉकडाऊन बद्दल प्रमोद सावंत यांचे महत्वाचे विधान...

यावेळी त्यांच्यासमवेत मुरगावचे आमदार (MLA) तथा नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, आमदार तथा राज्य कदंबा मंडळाचे अध्यक्ष कालूस आल्मेदा, कुठ्ठाळीच्या आमदार तथा राज्य पुनर्वसन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती एलिना साल्ढाणा, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी श्रीमती रिचीका कटियार, चिखली पंचायतीचे सरपंच सेबेस्ताव परेरा, सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर, बोगमाळो-चिकोळणा सरपंच श्रीमती विरोनिका डीक्रूज, तालुक्यातील इतर पंचायतीतील सरपंच,पंच सदस्य, तालुक्यातील दोन्ही जिल्हा पंचायत सदस्य आंतोन वाझ, अनिता थोरात, मुरगाव नगर पालिकेचे नगरसेवक दीपक नाईक, विनोद कीनळेकर,प्रजय मयेकर, मंजुषा पिळणकर,मृणाली मांद्रेकर, यतिन कामूर्लेकर, देविता आरोलकर, नारायण बोरकर, राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Anchoring) मुरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष श्रद्धा शेट्ये तर आभार प्रदर्शन दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सुद यांनी केले. सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते अनेकांना विविध योजनेचे धनादेश भेटविण्यात आले.

Related Stories

No stories found.