गोवा विद्यापीठाचे संगीत प्राध्यापक डॉ सॅन्टियागो  गिरेली यांचे कोरोनाने निधन 

gireli.jpg
gireli.jpg

पणजी : गोवा विद्यापीठाचे (University of Goa)  अर्जेंटिनाचे संगीतकार आणि प्राध्यापक डॉ सॅन्टियागो लुसार्डी गिरेली (Dr. Santiago Girelli)  (वय 42) यांचे कोविड 19 मुळे बुधवारी (ता.19)  निधन झाले.  कोविडमुळे  गिरेली यांनी दक्षिण गोव्यातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे एक महिन्यापूर्वी गिरेली यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.  त्यांना आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी स्पेनला जायचे होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. अशी माहिती गोवा विद्यापीठाच्या ‘व्हिजिटिंग चेअर प्रोफेसर प्रोग्राम’चे माजी संचालक रामराव वाघ यांनी दिली.  (Dr. Santiago Girelli, Professor of Music, University of Goa, passed away at Corona) 

अँथनी गोन्साल्वीस विद्यापीठाची 2013 मध्ये स्थापना झाली. तेव्हापासूनच गिरेली तेथील गायकांना मार्गदर्शन करत होते.  1979 मध्ये अर्जेंटिनातिल ब्वेनोस एयर्समध्ये गिरेली यांचा जन्म झाला. गिरेली यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये काम केले आहे. दरम्यान गेल्या दोन दशकात त्यांनी  400 हून अधिक संगीत मैफिलिंचे नेतृत्त्वही केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते गोव्यात राहत होते. विद्यापीठ आणि चर्चमधील गायनाच्या कर्तव्याव्यतिरिक्त  2015 मध्ये त्यांनी वार्षिक केटेवन पवित्र संगीत महोत्सवाची सह-स्थापना केली.  तसेच, गेल्या वर्षी  कोविडच्या पहिली लाटेत त्यांनी  या साथीच्या रोगाचा नाश करण्यासाठी एकमेकाना मदत करण्यासाठी अमेझिंग ग्रेस व्हर्च्युअल गायन  मोहीम सुरू केली आणि तिचे नेतृत्त्वही केले. 

बुधवारी गोवा विद्यापीठानेही त्यांच्या मृत्यूवर दुख व्यक्त केले. विद्यापीठ परिसरातील संगीतात नाविन्यपूर्ण योगदानाबद्दल विद्यापीठाच्या कुलसचिव राधिका नाईक यांनी गिरेली यांचे कौतुक केले. दरम्यान, मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या डायरीत एकटेपणा आणि  वेदनांबद्दल लिहिले आहे.  1 मे रोजी त्यांनी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली होती. '' हे खूप सोपे नाही.  एकटेपणा, अनिश्चितता, वेदना,  श्वास घेण्यासाठी दैनंदिन धडपड आणि या देशाबद्दल मला किती प्रेम आहे  याची साक्ष देताना या साथीच्या आजाराने होणऱ्या वेदनांचा सामना करणे खूप कठीण अनुभव आहे.” असे त्यांनी आपल्या शेवटच्या पोस्ट मध्ये लिहिले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com