रेमडिसिवीरशिवाय रुग्णांना जीवदान देणारा डॉ. बावस्कर पॅटर्न गोव्यात चालणार का ?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

डॉक्टर हिंमतराव बावस्कर यांनी विंचूदंशवारील उपचारांबाबत जागतिक प्रसिद्धी  मिळवलेली आहे. यांनी 13 महिन्यापासून  रेमडेसिविरचा  उपयोग न करता 640 रुग्णांना बरे केले आहे. त्यांचे म्हनणे आहे की,  "ही वेळ पैसा कमवण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची वेळ आहे

डॉक्टर हिंमतराव बावस्कर यांनी विंचूदंशवारील उपचारांबाबत जागतिक प्रसिद्धी  मिळवलेली आहे. यांनी 13 महिन्यापासून  रेमडेसिविरचा  उपयोग न करता 640 रुग्णांना बरे केले आहे. त्यांचे म्हनणे आहे की,  "ही वेळ पैसा कमवण्याची नाही, तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात नवीन संशोधन देण्याची वेळ आहे. '' हाच निश्चय मनात ठेऊन त्यांनी वयाची सत्तर वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांना रक्तदाब आणि थायरॉइडचा आजार आहे. दिवसे न दिवस कोरोंना रुग्णांमध्ये वाढ होत
असताना देखील डॉ. बावस्कर यांनी एक दिवस ही दवाखाना बंद ठेवला नाही. त्यांच्या महाडमधील दवाखाण्यात कोरोना रुग्णांवरील उपचार सुरू ठेवले आहेत. (Dr. who gave life to patients without remedicivir. Will Bavaskar pattern work in Goa?)

  गोवा:  दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय
     
डॉक्टर बावस्करांनी कोरोना विषाणूंवर अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी या वरील मार्चपर्यंत प्रकाशित झालेली हजारो जर्नल्स वाचून काढली.  या अभ्यासावरून त्यांना असे समजले की गोवर आणि रुबेला  या विषाणू मधील 60 टक्के अमोनो असिड कोरोना विषाणूसारखेच असलेले आढळले. तेव्हा लस ही बाजारात आली नव्हती. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या बचावासाठी आणि त्यांच्या पत्नीने बीसीजी आणि एमएमआर या लसी घेऊन त्यांच्या दवाखान्यातील कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले. त्यांच्या परिवारातील सदस्यांनी देखील  फिजिकल डिस्टन्स, मास्क वापरण्याची सक्ती, सतत स्वच्छता आणि नाकात आयोडिनचे ड्रॉप यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने  प्रतिबंधात्मक उपचार व प्रशिक्षण डॉक्टर बावस्कर यांनी दिले. त्यांनी मास्क शील्ड आणि ग्लोव्हज यांचा देखील वापर केला. 

गोव्याला फिरायला जाताय जाणून घ्या नवीन नियम

तसेच त्यांना त्यांच्या अभ्यासात आढळले की  बीसीजी आणि एमएमआर या लसी घेतलेल्या असल्याने लहान मुलाना हा संसर्ग होत नाही. त्यामुळेच त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने स्वत:च्या प्रतिबंधासाठी या लसी घेतल्या आणि पिपीई किट आणि रेमडेसिविर न वापरता रुग्णसेवा सुरू ठेवली. डॉक्टर बावस्कर यांच्याकडे ऑक्सिजनची लेवल 65 टक्के असताना चालत आलेला रुग्ण वैद्यकीय परीभाषेत हँपी आयपॉक्सिया म्हणतात. त्याला पोटावर झोपून डॉक्टर बावस्करांनी स्टिरॉइड, ऑक्सिजन, अँटिव्हायरल आणि अँटी कोऑगुलंट याचा वापर करून त्या रुग्णाची ऑक्सिजनची पातळी ९५ टक्के पर्यंत वाढवली. बावस्करांनी त्यांच्या पत्नीसोबत आतापर्यंत 650 कोरोंना रुग्णांवर उपचार केले.  त्यापैकी काही रुग्ण उपचारास उशिरा आल्याने 11 रुग्ण दगावल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या