नाट्य अभिनेत्रींनी केली वटपौर्णिमा साजरी

Drama Actress celebrates Vatpoornima
Drama Actress celebrates Vatpoornima

मोरजी : वटपौर्णिमेचे (Vatpoornima) अनन्य साधारण पुराण काळापासून महत्व आहे. नवोदित विवाहित आणि सुहासिनी महिला पवित्र असलेल्या वटवृक्षाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करत असतात. गोमंतकातील आघाडीच्या नाट्य अभिनेत्री (Drama Actress) निवेदिता पुणेकर उर्फ चंद्रोजी व आरती पंडित उर्फ परब या दिग्गजांनी कोरोनातून मुक्ती मिळावी शिवाय सात जन्मी हाच पती बरोबरच आम्हाला रंगदेवतेची सेवा करण्यासाठी परत जन्मी हि कला मिळावी यासाठी वटवृक्षाला धागा बांधून विधिवत पूजा करून मागणे केले. (Drama Actress celebrates Vatpoornima)

आघाडीच्या दोन दिग्गज नायिका निवेदिता पुणेकर आणि आरती परब यांनी पार्से येथे उत्सव साजरा केला, एकमेकांना वटपौर्णिमाची भेट देवून आचार विचार प्रदान केले.

यंदाही कोरोना महामारीने कलेवर आणि उत्सवावर विरजण घातले असले. तरी या दिग्गज नायीकांनी उत्सव साजरा करताना कोरोनावर मात करण्यासाठी सर्वाना शक्ती द्यावी, शिवाय आम्हाला एकाच जन्मी नव्हे तर सात जन्मी कलेची सेवा करण्यासाठी जन्म मिळावा असे नवस केले.

हिंदू पंचागातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस महिला वटपौर्णिमा म्हणून गावागावात साजरा करतात. या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य आयुष्य आणि पुढच्या सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून पूजा करतात .त्या पलीकडे जात या  दिग्गज कलाकारांनी ज्या कलेमुळे आमची राज्यात व राज्याबाहेर ओळख झाली ती कला आम्हाला पुन्हा सात जन्मीच नव्हे तर प्रत्येक जन्मी मिळावी अशी प्रार्थना केली.

निवेदिता पुणेकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सध्या कोरोना महामारीचा काळ असल्याने व नियम पाळून उत्सव साजरा केला जातो. विवाहित स्त्रियांच्या जीवनातला हा महत्वाचा उतस्व आहे. मोठ्या उत्साहात जरी साजरा यंदाही करता आला नाही तरीही आम्ही साधे पद्धतीने विचारांची देवाण घेवाण करून केला , देवाकडे जे दरोज वटपौर्णिमेला मागणे मागतो तेही मागितले शिवाय कोरोना मुक्त होवून आम्हाला परत आमची कला चार चौघात सादरीकरण करायला मिळू दे , शिवाय प्रत्येक जन्मी आम्हाला हीच कला मिळू अशी आम्ही आजच्या दिनी प्रार्थना केली. पर्यावरण शास्त्राच्या नजरेतून वडाचे महत्व विशेस असल्याने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून मनोभावे आम्ही पूजा केली असे निवेदिता पुणेकर या नायिकेने सांगितले.

काणकोणात वटपौर्णिमेवर कोरोनाचे सावट

दरम्यान, काणकोणात करोना महामारीमुळे महिलांनी गटांनी वडाची पुजा करण्याचे टाळून एक एकट्याने वडाच्या झाडाखाली जाऊन वडाची पुजा केली. कदाचित आपल्या पती देवाबरोबरच या करोना महामारीपासून सर्वाचे रक्षण करण्याचे मागणे त्यांनी मागितले असावे.काणकोणात दरवर्षी गावातील ठरावीक वडाच्या झाडाखाली जाऊन गटगटाने वडाची पुजा करण्याची प्रथा होती.मात्र गेल्या वर्षापेक्षा यंदा या प्रथेत खंड पडला आहे.काहीनी करोना महामारीच्या भितीने घरातच वडाची फांदी आणून त्याची पुजा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com