नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

नाटकाच्या माध्यमातून चांगला संदेश पोचवला तर नवी पिढी त्यातून बोध घेईल. नाटक हे कलेचे जिवंत आणि अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे 
केले.

पणजी :  नाटकाच्या माध्यमातून चांगला संदेश पोचवला तर नवी पिढी त्यातून बोध घेईल. नाटक हे कलेचे जिवंत आणि अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे 
केले.

‘रुद्रेश्वर’ पणजी या संसंस्थेच्या पालशेतची विहीर या नाटकाला महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत अंतिम फेरीत प्रथम पारितोषिके प्राप्त झाले. मराठी रंगभूमी दिनाचा योग साधून या नाटकात काम केलेले कलाकार, तंत्रज्ञ अशा २५ जणांचा सत्कार गुरुवारी संस्थेने कला अकादमी येथे घडवून आणला. या सोहळयात प्रमुख पाहुणे या नात्याने गोविंद गावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे पणजी महानगरपालिककेचे महापौर उदय मडकईकर, संस्थेचे अध्यक्ष व नातकाचे दिग्दर्शक दीपक आमोणकर, नाटकाचे लेखक तथा प्रथितयश रंगकर्मी विजयकुमार नाईक, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक उपस्थित होते.

प्रेक्षकांना सतत नवीन विषयांवरील नाटकांची प्रतीक्षा असते. तेव्हा नाट्यसंस्थानी नवीन विषय हातळावेत असे सांगून गावडे म्हणाले, रंगमंचावरील मुख्य कलाकारांबरोबर पडद्यामागील कलाकारांनाही तेवढाच सन्मान मिळाला पाहिजे. कारण त्यांचे प्रयोगात महत्त्वपूर्ण योगदान असते. सगळी तांत्रिक अंगे व्यवस्थित जुळून आली तरच प्रयोग यशस्वी होतो. 
रुद्रेश्वर ही नावाजलेली संस्था असून कलेबरोबरच, क्रीडा, सामाजिक कार्य या क्षेत्रातही संस्थेचे योगदान आहे. या संस्थेने यशाची घोडदौड अशीच सुरू 
ठेवावी.

उदय मडकईकर म्हणाले, गोव्यात उदंड नाट्यप्रेम आहे. नाट्य प्रेमी नवीन नाटकांची वाटच पहात असतात आणि भरभरून प्रतिसादही देतात.गोवा ही कलाकारांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.रुद्रेश्वरने नाट्य क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. त्यांनी अशीच दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणावीत.
यावेळी गोविंद गावडे यांच्या हस्ते, लेखक विजयकुमार नाईक, दिग्दर्शक दीपक आमोणकर, नेपथ्यकार योगेश कापडी, संगीतकार अजय नाईक, प्रकाश योजनाकार गंगाराम नार्वेकर, रंगभूषाकार एकनाथ नाईक, वेशभूषाकार मनुजा शेट नार्वेकर, ध्वनिसंकलक नीतेश नाईक,तसेच कलाकार सिद्धी उपाध्ये, गायत्री पाटील,दीपक किंजवडेक,गौरी शेट शिरोडकर, कुणाल धारगळकर, प्राजक्ता लोटलीकर, मन्मेष नाईक, योगीश जोशी, अशोक परब, युवराज साखळकर, प्रसाद कळंगुटकर, संगम चोडणकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या