Modi@20 पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन, मोदींचा CM ते PM असा प्रवास उलघडणारे पुस्तक

Modi@20 Book
Modi@20 BookDainik Gomantak

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री ते पंतप्रधान या प्रवासाला वीस वर्षे पूर्ण झाले आहेत. हाच प्रवास उलघडणारे पुस्तक 'Modi@20 ड्रिम्स... मिट...डिलिव्हरी' या पुस्तकाचे प्रकाशन पणजी, गोवा येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.

CM Pramod Sawant at book launch
CM Pramod Sawant at book launch Dainik Gomantak

यावेळी गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष तानाजी शेठ रानवडे, भाजप महाराष्ट्रातील भाजप नेत्या चित्रा वाघ, भाजप नेते बी. एल. संतोष, दत्तेश प्रभू प्ररूळेकर, गिरीराज वेरणेकर तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्यदोय यावर दृढ विश्वास ठेवून आत्मनिर्भर भारत हा दृष्टिकोन देशाला दिला आहे. न्यू इंडियाची (New India) निर्मिती करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक आहे' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Modi@20 Book
खड्डेमय रस्त्यांमुळे मडगावात धूळ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001 मध्ये गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी धुरा संभाळली, 2019 मध्ये दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या प्रवासाला वीस वर्षे पूर्ण झाले आहेत. हा प्रवास उलघडणारे हे पुस्तक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com