Drink and Drive : रात्रीच्या वेळी 31 मद्यपींना मिळाला दणका

पोलिसांची मोहीम तीव्र ; पणजीत 8 तर फोंडा येथे 5 प्रकरणांची नोंद
Goa Traffic Rules
Goa Traffic Rules Dainik Gomantak

पणजी : मद्यप्राशन करून बेफाम वाहन चालविल्‍याने गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर चालकांमध्ये जनजागृती करून बेलगाम वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाने काल रात्रीपासून मद्यपी चालकांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत पहिल्या दिवशी 31 जणांना दणका मिळाला.

पणजीत 8 तर फोंड्यात 5 प्रकरणे नोंद झाली आहे. कारवाई झालेले बहुतेक पर्यटक आहेत. त्यांची वाहने ताब्यात घेऊन मद्यपी अहवाल विशेष दंडाधिकाऱ्यांकडे शिक्षेसाठी आज पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी दिली.

Goa Traffic Rules
CM Pramod Sawant : भारत विश्‍वगुरू व्हावा हेच पंतप्रधानांचे स्वप्न!

काल रात्रीच्या वेळी पोलिसांनी राज्यात दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी पाच मिळून दहा ठिकाणी मद्यपींविरोधी मोहीम सुरू केली. ही कारवाई मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत सुरू होती. पणजी वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रँडन डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली मेरशी सर्कल येथे ही कारवाई सुरू झाली तेव्हा दुचाकीवरून आलेले काही पर्यटक मद्याच्या धुंदीत होते.

चारचाकी चालकही मद्यप्राशन केलेले सापडले. अल्कोमीटरने केलेल्या ब्रिथ ॲनलायझर चाचणीत रक्तामधील मद्यप्रमाण 30 मि. ग्रॅ. किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास कारवाई केली जाते. काल रात्री केलेल्या चाचणीत कारवाई केलेल्या अनेकांचे मद्यप्रमाण हे 45बीएसी पेक्षा अधिक होते.

मद्यपी चालकांविरोधातील या कारवाईवेळी अनेक दुचाकीस्वार हेल्मेट नसताना पोलिसाना सापडले. दंडात्मक कारवाई 1 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी माहिती देताच या दुचाकीस्वारांना धक्काच बसला. त्यांच्याकडे हेल्मेट होते, मात्र त्‍यांनी ते घातले नव्हते. हेल्मेटच्या किंमतीपेक्षा दंडाची रक्कम अधिक आहे. तेवढी रक्कम काहींकडे नव्हती.

त्यामुळे ते पोलिसांकडे गयागया करत होते. मात्र पोलिसांनी त्यांनी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करत त्यांची वाहने ताब्यात घेतली. त्‍यामुळे काहींवर पायपीट करण्‍याची वेळ आली.

दिवसभरात 766 प्रकरणे नोंद :

या मद्यपी चालकांविरोधातील मोहिमेवेळी वाहतूक पोलिसांनी राज्यभरातून हेल्मेट न वापरल्याप्रकरणी 58 तर वाहनांच्या काळ्या काचाप्रकरणी 103 प्रकरणे नोंद केली. वाहतूक पोलिसांतर्फे काल दिवसभरात रात्री 12 वाजेपर्यंत 766 प्रकरणे मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोंद केली. वेगमर्यादा व मद्यपी चालकांवर या मोहिमेत अधिक भर देण्यात येत आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे.

नोंद झालेली प्रकरणे

  • मेरशी सर्कल 8

  • मडगाव जुने मार्केट 3

  • आगोंद पाळोळे जंक्शन 2

  • कोलवा चाररस्ता जंक्शन 2

  • बेतोडा जंक्शन 5

  • सावर्डे-तिस्क 4

  • कळंगुट डॉल्फिन सर्कल 1

  • म्हापसा गांधी चौक 4

  • हणजूण बॉबी बार जंक्शन 1

  • अस्नोडा पार जंक्शन 1

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com