Goa Tourism: पर्यटकांना उघड्यावर पार्टी, मद्यपान भोवणार; 50 हजार रुपये दंडाची तरतूद

वाढत्या बेशिस्त वर्तणूकीमुळे राज्य प्रशासनाने घेतला निर्णय
Goa Tourism
Goa TourismDainik gomantak

गोवा राज्यात वाढत असलेल्या पर्यटकांच्या बेशिस्त वर्तणूकीमुळे राज्य प्रशासनाने एक निर्णय घेतला असून यामध्ये पर्यटनस्थळांजवळ उघड्यावर अन्न शिजवणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या, किनाऱ्यांवर बेकायदेशीर व्यवसाय थाटणाऱ्या, भिकारी, तसेच निश्चित क्षेत्राबाहेर जलक्रीडा बोटी चालवणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे.

(Drinking and cooking at public places in goa get ready to pay up to 50000 fine )

Goa Tourism
Goa: सायबर चोरट्यांचा पर्यटकांच्या पैशांवर डल्ला; हॉटेल बुकिंगच्या नावाखाली लाखो रूपयांची फसवणूक

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना सुमारे 5 हजार ते 50 हजार रुपयापर्यंतचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक समुद्र किनाऱ्यावर पर्यटक उघड्यावर मद्यपान करत असल्याने स्थानिकांची डोके़दुखी वाढली होती. कारण असे पर्यटक मद्यपान झाल्यानंतर दारु बाटल्या किनाऱ्यावरील वाळूत खड्ड्यात ठेवत, त्यामूळे याच्या काचा इतरांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे.

Goa Tourism
Deviya Rane: आमदार होताच कामाचा धडाका; पर्येत दिव्या राणेंकडून विविध विकासकामांना हिरवा कंदील

तसेच राज्याच्या काही पर्यटनस्थळांजवळ पर्यटक हॉटेलला पैसे द्यावे लागू नयेत यासाठी, बाहेरच जेवणाचा बेत आखत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तर काही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे ही आढळत असल्याने अशा बेकायदेशीर वर्तणूकीवर पोलिसांच्या कारवाईमूळे चाफ बसणार आहे हे निश्चित. त्यामूळे गोव्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक बाहेर पार्ट्यांचा प्लॅन करणार असतील तर या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com