फर्मागुढीत दोन बसमध्ये धडक; चालकासह अन्य दोन प्रवासी जखमी

जखमींना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.
फर्मागुढीत दोन बसमध्ये धडक; चालकासह अन्य दोन प्रवासी जखमी
Bus Accident Dainik Gomantak

फर्मागुढी - फोंडा: आज सकाळी महाराष्ट्रातील व्होल्वो बसगाडी व स्थानिक प्रवासी बसगाडी यांच्यात झालेल्या टकरीत बसगाडीच्या एका चालकासह अन्य दोन प्रवासी जखमी झाले. (Driver along with 2 passengers injured in bus accident in Farmagudi, Goa)

Bus Accident
Gomantak Explained: यूनिफॉर्म सिविल कोड नेमका आहे तरी काय? जाणून घ्या कायद्याचे विविध पैलू

जखमींना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. व्होल्वो बसगाडी क्रमांक MH14 HG 4785 व गोव्यातील प्रवासी बसगाडी GA01 W4519 यांच्यात ही टक्कर झाली. व्होल्वो बसगाडी पुण्याहून पर्यटकांना घेऊन गोव्यात आली होती व मडगाव कोलवाकाडे जात होती तर गोव्याची प्रवासी बसगाडी फर्मागुढीला जात होती.

Bus Accident
कृषिमंत्री रवी नाईक यांच्या 'त्या' वक्तव्याबद्दल भाजपच्याच गोटात चर्चा सुरू

दरम्यान, उसगाव ते मोले महामार्गावर धारबांदोडा येथे काल रात्री झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात तिघा युवकांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात एक कारगाडी आणि दोन दुचाकींचे नुकसान झाले. दुचाकींवरील तिघांना जबर मार लागला. याबाबत माहिती अशी की, धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यासमोरील रस्त्यावर तिन्ही वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात घडला.

यात प्रकाश वस्त (वय 38, रा. तामसोडा - धारबांदोडा), अविनाश माईणकर (वय 28, रा. मेटावाडा - कुळे) व दिव्या वरक (वय 35, रा. पेटके - धारबांदोडा) हे जखमी झाले. जखमींना सुरवातीला तिस्क - धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले. फोंडा पोलिस स्थानकाचे हवालदार देविदास पर्येकर यांनी पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.