Goa News : उन्‍हात वाहनचालक ‘तापले’

उड्डाणपुलाचे काम : धारगळ येथे भर दुपारी दोन तास महामार्ग बंद
Drivers summer season Highway closed
Drivers summer season Highway closeddainik gomantak

मोरजी : मोपा विमानतळ लिंक रस्त्याच्‍या उड्डाणपुलासाठीची भली मोठी कमान यंत्राद्वारे नेण्‍याकरिता आज बुधवारी भर दुपारी रखरखत्‍या उन्‍हात कंत्राटदाराने दोन्ही बाजूंची वाहतूक किमान दोन तास रोखून धरली. त्‍यामुळे वाहनचालकांना तिष्‍ठत उभे रहावे लागले. विशेष म्‍हणजे कोणत्‍याच प्रकारची पूर्वसूचना न देता वाहतूक रोखून धरल्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. दरम्‍यान, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्‍यास मदत केली.

सविस्तर माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग ६६वर रेडकर हॉस्पिटलसमोर एका उड्डाणपुलाची कमान नेत असताना यंत्रणेने दोन तास दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद केली.याबाबत कोणतीच पूर्वसूचना देण्यात आली नव्हती किंवा वाहतूक पोलिसांना कळविण्‍यात आले नव्हते. संत सोहिरोबानाथ आंबिये कॉलेज मालपे ते रेडकर हॉस्पिटलपर्यंत तर विरुद्ध दिशेला धारगळ महाखाजन ते रेडकर हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नक्की काय घडलं याची कल्पना कोणालाच येत नव्हती.दरम्‍यान,या प्रकारामुळे मात्र सर्वांनाच मन:स्‍ताप सहन करावा लागला.

अन्‌ आमदार आले धावून

ही घटना भर दुपारी रखरखत्‍या उन्‍हात घडल्‍याने वाहनचालक भडकले. त्याचवेळी नागझर येथून स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर हे एका कार्यक्रमाला जात होते. रस्त्यावर त्‍यांना वाहनांच्‍या मोठ्या रांगा दिसून आल्‍याने नक्की काय प्रकार आहे, हे त्‍यांच्‍याही लक्षात येईना. त्यांनी तातडीने गाडीतून उतरून याबाबत माहिती जाणून घेतली. त्‍यांनी लगेच उपस्थित कामगार आणि संबंधितांशी चर्चा केली आणि वाहतूक सुरळीत करण्‍यास मदत केली. तसेच याबाबत वाहतूक पोलिसांना पूर्वसूचना देण्याची गरज होती. दिवसा हे काम करण्यापेक्षा रात्री करणे सोयीस्कर ठरेल, अशी सूचना त्‍यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com