Ponda News: बाळंतिणीसाठी ‘ड्रॉप बॅक’ सेवा; ‘ईमआरआय’चे वाहन

फोंडा उपजिल्हा इस्पितळात सेवा
Drop Back service inaugurated In ponda Hospital
Drop Back service inaugurated In ponda HospitalDainik Gomantak

एकनाथ खेडेकर

Drop Back Service Inaugurated In Ponda Hospital: येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या तसेच उपचार घेणाऱ्या एक वर्षाखालील मुलांना घरी पोचविण्यासाठी आरोग्य खात्याने १०८ रुग्णसेवा पुरवणाऱ्या ईमआरआय कंपनीमार्फत ड्रॉप बॅक सर्विस वाहन सुरू केले आहे.

या इस्पितळाच्या अधिक्षक डॉ. जयश्री मडकईकर यांनी या वाहनाचे पूजन करून सेवेला सुरवात केली. यावेळी डॉ. मडकईकर यांनी सांगितले की, जननी शिशू सुरक्षा योजने अंतर्गत आरोग्य खात्याने इएमआरआय कंपनीमार्फत ही सेवा सुरू केली आहे. याचा प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला व बालकांना लाभ होणार आहे.

दाभाळाची महिला ठरली पहिली लाभार्थी

शुक्रवारी या सेवेचे उद्घाटन झाल्यानंतर या वाहनाने अळुले, दाभाळ येथील बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह घरी नेऊन सोडण्यात आले.

आरोग्य खात्याने हा चांगला उपक्रम राबविलेला असल्याने या महिलेने तसेच तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य खात्याचे आभार मानले.

Drop Back service inaugurated In ponda Hospital
Goa Jatra: फुल ते गोबी मंचुरियन विक्रेता... 32 वर्षांपासून गोव्यातील एकही जत्रा न चुकवलेला 60 वर्षांचा तरुण

ग्रामीण महिलांना मिळणार मोठा दिलासा : गांवकर

पहिल्यांदाच लाभ घेतलेली ओळुले, दाभाळ येथील सुधा गांवकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातून इथे येणाऱ्या महिलांना प्रसूतीनंतर घरी जाताना वाहनाची समस्या भासते. सरकारने ही सेवा सुरू करून दिलासा दिला आहे. यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आभार, असे त्या म्हणाल्या.

आरोग्यमंत्र्यांची संकल्पना

सरकारच्या सहयोगाने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आपल्या संकल्पनेतून ''ड्रॉप बॅक सर्विस'' सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी दाभाळ येथील बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह घरी सोडण्यात आले.

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ही सेवा असून राज्यात कोणत्याही भागात ही सेवा दिली जाईल, असे कंपनीचे अधिकारी श्रीनिवास देशपांडे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com