गोव्यात नाइट पार्ट्या सुरू असल्याने किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय जोमात

विलास महाडिक 
मंगळवार, 4 मे 2021

कोविड महामारी संकटामुळे गोव्यातील पर्यटकांचे प्रमाण कमी झाले असले तरी किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय तेजीत आहे. यावर्षी गेल्या चार महिन्यात गोवा पोलिसांनी 41 ड्रग्जची प्रकरणे नोंद करून 34.5 किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे

पणजी: कोविड महामारी संकटामुळे गोव्यातील पर्यटकांचे प्रमाण कमी झाले असले तरी किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय तेजीत आहे. यावर्षी गेल्या चार महिन्यात गोवा पोलिसांनी 41 ड्रग्जची प्रकरणे नोंद करून 34.5 किलो ड्रग्जचा साठा जप्त केला आहे व ड्रग्जची किंमत सुमारे 83 लाख रुपये आहे. कोविड काळातही रात्री संगीत रजनी पार्ट्या सुरू असल्याने ड्रग्जची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. या नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये अधिक तर गांजाची प्रकरणे आहेत. 

देशी पर्यटकांकडून स्वस्त ड्रग्जला मागणी

देशभरात कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर अनेक राज्यांनी टाळेबंदी तसेच वाहतुकीवर निर्बंध घातले होते मात्र गोव्याने पर्यटकांसाठी सर्व सीमा खुल्या ठेवल्या होत्या. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेच निर्बंध नव्हते. पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला होता मात्र त्यामुळे राज्यात ड्रग्ज व्यवसाय थंडावला होता त्याने पुन्हा डोके वर काढले. ड्रग्जच्या किंमती ऐवजी गांजा या स्वस्ताच्या ड्रग्जला स्थानिक तसेच देशी पर्यटकांकडून मागणी होत असल्याने या वर्षात अधिक पोलिसांनी नोंदविलेल्या प्रकरणांत गांजाची प्रकरणे अधिक आहेत. अटक केलेल्या 41 संशयितांमध्ये 36 देशी तर 5 जण विदेशी नागरिक आहेत. गेल्या वर्षीच्या चारमाहीच्या तुलनेत यावर्षी नोंद झालेली प्रकरणे कमी आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट वाढल्यानंतर गोव्याच्या शेजारील राज्ये महाराष्ट्र व कर्नाटकने लोकांना कडक निर्बंध लागू केल्याने पर्यटकांची संख्या खूपच कमी झाली आहे. किनारपट्टी भागात तर पर्यटक दिसेनासे झाले आहेत. काही पब्समध्ये संगीत रजनी पार्ट्यामध्ये स्थानिकांची उपस्थिती असते त्यामध्ये ड्रग्ज विक्री होण्याचे प्रकार घडत आहेत.

ड्रग्ज विक्रेता टायगर मुस्तफा गजाआड; एनसीबी गोवाची कारवाई 

3 विदेशी नागरिकांना अटक  

उत्तर गोवा पोलिसांनी गेल्या चार महिन्याच्या कालावधीत 41 पैकी 22 प्रकरणे नोंद केली आहे. त्यात 20 देशी व 2 विदेशी नागरिक आहेत. 16.5 किलो ड्रग्ज जप्त केला असून त्याची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी 6 प्रकरणे नोंद केली त्यात 6 देशी नागरिकांचा समावेश आहे. 4.5 किलो ड्रग्ज जप्त केला त्याची किंमत सुमारे 6 लाख रुपये. अंमलीपदार्थविरोधी कक्षाने 8 प्रकरणे नोंद केली आहेत त्यामध्ये 5 देशी तर 3 विदेशी नागरिकांना अटक झाली आहे. 3.7 किलो ड्रग्ज जप्त केला आहे त्याची किंमत सुमारे २९ लाख रुपये आहे. क्राईम ब्रँचने 5 प्रकरणांमध्ये 5 देशी नागरिकांना अटक केली असून संशयितांकडून सुमारे 14 किलो ड्रग्ज जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे 23 लाख रुपये आहे. 

किनारपट्टीत विक्री
किंमती ड्रग्ज परवडत नसल्याने स्वस्त असलेल्या गांजाकडे देशी पर्यटक तसेच स्थानिक वळत आहेत. त्यामुळेच अधिक तर नोंद झालेली प्रकरणे ही गांजाची आहेत. तरुण पिढी या ड्रग्जकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे हे ड्रग्ज विक्रेते महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य बनवत आहेत. पोलिस खात्याच्या जिल्हा तसेच एएनसी व क्राईम ब्रँच आपापल्या तऱ्हेने या ड्रग्ज माफिया व विक्रेत्यांबाबत माहिती मिळवून कारवाई करत असल्याने प्रकरणांच्या नोंदीचे प्रमाण घटले आहे. या ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे किनारपट्टी भागात मोठे असून ते मोडून काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असे मत अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे अधिक्षक महेश गावंकर यांनी व्यक्त केले.

Goa Assembly: कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर दिगंबर कामत यांचा बहिष्कार 

संबंधित बातम्या