ड्रग्जप्रकरणी तुरुंगरक्षक आज होणार निलंबित

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोलवाळ कारागृहात कैद्यांशी साटेलोटे असलेल्या व त्यांना मोबाईल तसेच ड्रग्जचा पुरवठा करणारा तुरुंगरक्षक रामा कोरगावर याला काल अटक केल्यानंतर त्याच्या निलंबनाचा औपचारिकतेचा आदेश उद्या (१४ सप्टेंबर) काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक आशुतोष आपटे यांनी दिली.

पणजी: कोलवाळ कारागृहात कैद्यांशी साटेलोटे असलेल्या व त्यांना मोबाईल तसेच ड्रग्जचा पुरवठा करणारा तुरुंगरक्षक रामा कोरगावर याला काल अटक केल्यानंतर त्याच्या निलंबनाचा औपचारिकतेचा आदेश उद्या (१४ सप्टेंबर) काढण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षक आशुतोष आपटे यांनी दिली.
 
काही दिवसांपूर्वी संशयित रामा कोरगावकर हा ड्युटीवर असताना कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता दोन भ्रमणध्वनी संच (मोबाईल) जप्त करण्यात आले होते. त्यावेळी त्याने त्वरित माफी मागितल्याने त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले होते. यापूर्वी त्याला कैद्यांशी असलेल्या लागेबांधेवरून तसेच ड्रग्जचा पुरवठा करत असल्याच्या संशयावरून त्याला निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन तो हल्लीच सेवेत रूजू झाला होता. कारवाई होऊनही त्याची कारागृहातील ‘दबंग’गिरी कमी झाली नव्हती. कारागृहातील कैद्यांचे त्याच्याबरोबर पुन्हा घनिष्ठ संबंध झाले होते. तो कैद्यांना फोन करण्यासाठी मोबाईल वापरण्यास व ड्रग्ज पुरवठा करत असल्याचा संशय त्याच्यावर होता. गेल्या शनिवारी दुपारी २ च्या ड्युटीवर होता व मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या आयआरबीच्या पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या पायातील बुटांमध्ये त्याने हा ड्रग्ज (गांजा) लपविला होता. 

दरम्यान, कोलवा कारागृहात यापूर्वीही मोठमोठ्या मद्याच्या पार्ट्या, ड्रग्जचा व मोबाईल पुरवठा,सिगारेटस् इत्यादी कैद्यांपर्यंत पोहचत असल्याने प्रवेशद्वारावरील सुरक्षा तसेच तपासणीत वाढ करण्यात आली होती, तरीही कारागृहात हे प्रकार सुरूच होते. 

संबंधित बातम्या