Goa News : पुराव्याअभावी ड्रग्ज संशयित तुर्की नागरिक मुरात निर्दोष

तुर्की भाषेतून माहिती दिली नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
Court | Goa Crime News
Court | Goa Crime News Dainik Gomantak

ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या तुर्की नागरिक असलेला संशयित मुरात तास याची झडती घेण्यापूर्वी त्याच्या भाषेतून माहिती देण्यात आल्याचे तपासात उघड झाले नसल्याने अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयिताची निर्दोष मुक्तता केली. त्याला समजत नसलेल्या हिंदी भाषेतून ती देण्यात आल्याचे खटल्यावरील सुनावणी समोर आल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिस पथकाने 7 फेब्रुवारी 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित मुरात तास याच्या भाडेपट्टीच्या हरमल - पेडणे येथील खोलीवर छापा टाकला होता व त्याच्या खोलीतून ७१० ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त केला होता. या खटल्यावरील सुनावणीवेळी १३ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या.

Court | Goa Crime News
Thimaaveshi Boat: अत्याधुनिक जहाज ‘थिमावेशी’ गोव्याकडून मालदिवला रवाना

सुनावणीवेळी संशयिताला तुर्की भाषाच येत असल्याने त्याला झडती घेण्यापूर्वी त्याच्याच भाषेत झडतीबाबतची माहिती द्यायला हवी. मात्र ती कोणत्या भाषेत देण्यात आली याचे स्पष्टीकरण तपासकामात केलेले नाही. तो राहत असलेल्या गेस्ट हाऊसचे नोंदणी पुस्तक पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते.

पोलिसांनी तो तेथे राहत होता की नाही याचा पुरावा सादर केलेला नाही. तसेच एनडीपीएस कायद्यातील कलम ५० चा वापर केलेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यातील पुराव्याअभावी त्याला निर्दोष ठरवत असल्याचे सत्र न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.

Court | Goa Crime News
Goa News : सांकवाळची ग्रामसभा राहिली अर्धवट

पुराव्यांचा अभाव

पोलिसांनी संशयिताला ज्या गेस्ट हाऊसच्या खोलीत ड्रग्जसह ताब्यात घेतले होते, असा दावा केला होता तो गेस्ट हाऊसच्या मालकाने दिलेल्या जबानीत फेटाळला आहे. त्याने खोली स्कॉट ॲलेक्झेंडर याला दिली होती. त्यामुळे गेस्ट हाऊसमध्ये येणाऱ्या - जाणाऱ्यांच्या नोंदीमध्ये ॲलेक्झांडरचे नाव होते.

मात्र, मुरात याची कोठेही नोंद नाही. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्ह्यात तथ्य आहे की नाही, असा संभ्रम निर्माण होतो. संशयिताला पुराव्याअभावी सोडण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com