Drugs Seize: गोव्यातील पंधरवड्यात, 32 लाखांचे ड्रग्स जप्त

रात्रीच्यावेळी किनारपट्टी क्षेत्रात सुरु असलेल्या पार्ट्यांवेळी पोलिसांनी देखरेख सुरू केली आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

North Goa: उत्तर गोवा जिल्हा पोलिस व अंमलीपदार्थविरोधी कक्षाने Narcotics Control Bureau (एएनसी) गेल्या पंधरवड्यात 10 प्रकरणे नोंदवून 32 लाखांचा विविध प्रकारचा ड्रग्स जप्त केला व 11 जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त ड्रग्सप्रकरणाशी संबंधित असलेल्या तिघांना पीट एनडीपीएस कायद्याखाली वर्षभरासाठी बंदिस्त करण्यात आले आहे.

उत्तर गोवा पोलिस कक्षेतील पोलिस स्थानकांनी 8 ड्रग्जची प्रकरणे नोंद करून गांजा, एक्सटसी गोळ्या, एलएसडी पेपर्स, एमडीएमए, एलएसडी कॅप्सूल्स, चरस, कोकेन तसेच मेथाम्फेटामाईन यासारखे 18 लाखांचे ड्रग्स जप्त केले आहेत.

Goa Crime
Goa कुचेली येथे पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

अंमलीपदार्थविरोधी कक्षाने दोन प्रकरणे नोंदवून 14 लाखांचे ड्रग्स जप्त केले आहेत. त्यामध्ये गांजा व हशिश तेल याचा समावेश आहे. या कारवाईवेळी अटक करण्यात आलेले बहुतेक संशयित हे परप्रांतीय आहेत. यामध्ये तीन विदेशी नागरिक आहेत. सर्वाधिक 13 किलो गांजा (13 लाख) तर 80 ग्रॅम एमडीएमए (8 लाख) या गेल्या काही दिवसांत जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना म्हणाले.

गोवा पोलिसांच्‍या क्राईम ब्रँचने काल मध्यरात्रीच्या सुमारास हणजूण व म्हापसा येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एक वृद्ध अमेरिकन विदेशी नागरिक व एका स्थानिक ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली. त्यांच्याकडून एमडीएमए, हशिश व एलएसडी हा अंमलीपदार्थ जप्त केला. त्याची किंमत सुमारे 14.60 लाख रुपये आहे. या दोघांनाही न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

Goa Crime
Madgaon Municipality : माफीनामा देत 15 नगरसेवकांकडून अविश्‍वास ठरावावर स्वाक्षऱ्या

रात्रीच्यावेळी किनारपट्टी क्षेत्रात सुरू असलेल्या पार्ट्यांवेळी पोलिसांनी देखरेख सुरू केली आहे. ज्या ठिकाणी ड्रग्सचा वापर होत असल्याचे पुराव्यासह सापडल्यास ते पब किंवा रेस्टॉरंट बंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे ते सील करण्यासाठी शिफारस केली जाईल. पोलिसांनी पीट एनडीपीएस या कायद्याखाली पूर्वाश्रमी ड्रग्जमध्ये असलेले व सध्या जामिनावर असलेल्या दलाल व विक्रेत्यांना बंदिस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.

शाळांमध्ये जनजागृती: कळंगुट पोलिसांतर्फे कांदोळी (Candolim) येथील सेंट तेरेझा हायर सेकंडरी स्कूलमधील 350 तसेच आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये म्हापसा पोलिस उपविभागीय कार्यालयातर्फे जनजागृती करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com