Goa Crime : सासष्टीत 11.45 लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेची कारवाई
Crime Branch Police arrested
Crime Branch Police arrestedDainik Gomantak

Goa Crime : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने (Goa Crime Branch) एका घरावर छापा टाकत अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ही कारवाई असोळणा-सासष्टी येथे मंगळवारी करण्यात आली. या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 11.45 लाख रुपये एवढी आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, घाणेवाडो असोळणा येथील एका घरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती गुप्तहेरांनी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, पोलीसांनी मोहिम राबवत मंगळवारी सायंकाळी असोळणा येथील मारीया फर्नांडिस याच्या घरावर छापा टाकला.

Crime Branch Police arrested
Goa Government: रोजगार विनिमय केंद्रात 1.42 लाख उमेदवारांची नोंदणी

यावेळी पथकाने बेबेडिटो फर्नांडिस (51, पैंगीण- - काणकोण) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून 11.45 लाख रुपये किमतीचे 5.452 किलो गांजा, 636 ग्रॅम हशीष तेल आणि 2 हजार रोख जप्त केले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांनी संशयित फर्नांडिस याच्याविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम 20 (बी) (ii) (बी) अंतर्गत गुन्हा दाखल 20 (बी)(ii)(बी) करून अटक केली.

Crime Branch Police arrested
Goa News: वास्कोत ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणार

अधीक्षक निधीन वाल्सन आणि अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरीफ जॅकीस, नॅथन आल्मेदा यांच्या नेतृत्वाखाली हवालदार दिनेश पिकुळकर, संदीप मडकईकर, कॉन्स्टेबल शांतकुमार गौडलांगिरी, धनंजय देवीदास व पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com