सेर्नाभाटी कोलवा येथे झालेल्या अपघाताचा थरकाप अजूनही ताजा

‘ड्रंक अँड ड्राईव्ह'; दोन पोलिसांचे गेले प्राण
Goa Accident News
Goa Accident NewsDainik Gomantak

मडगाव : 15 जानेवारी रोजी रात्री सेर्नाभाटी कोलवा येथे झालेल्या त्या दुर्घटनेने लोकांच्या मनाचा थरकाप उडविला होता. कोलवा येथे नाकाबंदीवर असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने आधी रस्त्यावरील बॅरीकेड्स उडवले त्यानंतर अन्य दोन गाड्यांना ठोकरत ड्युटीवर असलेल्या शैलेश गावकर व विश्वास देईकर या दोन पोलीस शिपायांचा प्राण घेतला होता. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ ची ही घटना आज राज्यातील घडणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा ताजी झाली.

Goa Accident News
Sudin Dhavalikar : राज्यातील निकृष्ट रस्त्यांसाठी माजी साबांखा मंत्री जबाबदार

15 जानेवारी रोजी झालेल्या या अपघातप्रकरणी कोलवा पोलिसांनी कारचालकावर आरोपपत्र दाखल केले. त्यासंदर्भात सुनावणीही सुरू झाली आहे. त्या रात्रीचा तो थरकाप लोक अजूनही विसरलेले नाहीत.

अबकारी खात्यातील कर्मचारीही गेला

आणखी एक प्रकार 26 फेब्रुवारी रोजी गुडी पारोडा येथे घडला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रिक्षा चालकाने स्कुटरला धडक दिल्याने विजय पैगीणकर या अबकारी खात्यातील कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. अन्य दोन अपघातांत स्वतः वाहनचालकांना आणि आतील बसलेल्यांना जीव गमवावा लागला होता.

प्रकार भीषणच

15 जानेवारी रोजीची घटना ताजी असतानाच 16 जानेवारी रोजी रात्री आणखी एका मध्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्या एका चालकाने स्कुटरने जात असलेल्या एका दाम्पत्याला उडवून दिले होते. ही धडक एवढी तीव्र होती की ते दोघे उसळून 50 मीटर दूर फेकले गेले होते. या अपघातामुळे केवळ दोघांचा बळी गेला नसून त्यांची लहान मुलगी अनाथ झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com