दूधसागरला फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी, पर्यावरण पर्यटन विभागाने घेतला मोठा निर्णय

उप वनसंरक्षक वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन विभागाने धबधब्याचे पर्यटन क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dudhsagar Tourist Circuit Closure Notice
Dudhsagar Tourist Circuit Closure NoticeDainik Gomantak

Dudhsagar Tourist Circuit Closure Notice: पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले आपोआप दूधसागर धबधब्याच्या दिशेने वळतात. पण, या पावसाळ्यात तुम्ही दूधसागर धबधबा पाहण्यासाठी जाणार असाल तर, थांबा! उप वनसंरक्षक वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन विभागाने धबधब्याचे पर्यटन क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

उप वनसंरक्षक वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन उत्तर विभागाने याबाबत एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान मोले येथील दूधसागर पर्यटन क्षेत्र 11 जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वन्यजीवांचा प्रसार आणि आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, हा निर्णय कधीपर्यंत लागू राहणार आहे, याबाबत या परिपत्रकात काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com