साखळी-विर्डी बगलमार्गावर दरड कोसळली

rains in Goa
rains in Goa

डिचोली: मागील आठवड्यापासून कहर केलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढला असून,काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. आज शनिवारी काहीवेळ वगळता दिवसभर कोसळधार पाऊस पडला. पावसाच्या तडाख्यात काल मध्यरात्री ते  शनिवारी दुपारपर्यंत तीन ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. आमोणे येथे एका घरावर झाड कोसळून घराची मोडतोड झाली. अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.(Due to heavy rains a large rock fell on the side road from Sanquelim to vardi )

दरम्यान, कोसळधार पावसामुळे साखळी ते विर्डी या बगलमार्गावर दरडीसह भलामोठा दगड कोसळण्याची घटना घडली. दगड रस्त्यावर कोसळल्याने दुपारपर्यंत या बगलमार्गावरुन अवजड वाहतूक बंद होती. केवळ  दुचाकी आणि मोटारगाड्यांना वाहतूक करायला मिळत होती. कोसळधार पावसामुळे साखळीतील वाळवंटीसह डिचोली  नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली आहे.

दुपारपर्यंत डिचोली नदीच्या पाण्याची पातळी 2.4 मीटरपेक्षा अधिक तर वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी दिड मीटर पेक्षा अधिक झाली होती. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बहूतेक भागातील वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला. दिवसभर आकाशात ढगही दाटून होते. कोसळधार पावसामुळे आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाचा जोर वाढला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com