पणजीतील मार्गांत आज बदल

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

नरकासुरामुळे पणजीत आज सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्रभर वाहतुकीत बदल होणार आहे, असे वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख यांनी कळविले आहे. या वाहतूक बदलात सहा मार्ग एकेरी करण्यात आलेले आहेत.

पणजी: नरकासुरामुळे पणजीत आज सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्रभर वाहतुकीत बदल होणार आहे, असे वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख यांनी कळविले आहे. या वाहतूक बदलात सहा मार्ग एकेरी करण्यात आलेले आहेत.

त्यामध्ये आल्तिनो ते भाटले, भाटले ते मधुबन कॉम्प्लेक्स, मधुबन कॉम्‍प्लेक्स ते काकुलो मॉल, काकुलो मॉल ते बशिक हाऊस. बशिक हाऊस ते मधुबन कॉम्प्लेक्स, सेंट फ्रान्सिस चॅपल ते मारुती मंदिर या मार्गावर एकेरी वाहतूक असेल. या बदलानुसार वाहनधारकांनी वाहने मार्गक्रमीत करावीत, असे नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या