''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तमाम गोमंतकीयांची देशभरातच नव्हे तर जगभरात नाचक्की''

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

पाच पालिकेतील निवडणूक रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तमाम गोमंतकीयांची देशभरातच नव्हे तर जगभरात नाचक्की झाली.

पणजी: पाच पालिकेतील निवडणूक रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तमाम गोमंतकीयांची देशभरातच नव्हे तर जगभरात नाचक्की झाली असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला. ते म्हणाले भाजपचे सरकार निलाजरेपणाने आता आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतो असे म्हणत असले तरी त्यांना अन्य कोणताही पर्याय नाही. बारा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

गोव्यातील त्या दहा आमदारांना अपात्र न ठरवल्यास चोडणकर पुन्हा सर्वोच्च...

विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी या निवाड्यातून योग्य तो धडा घ्यावा. सर्वोच्च न्यायालय कोणालाही सोडणार नाही हे समजून घ्यावे आणि आमदारांनी केलेल्या बेकायदा कृत्याबद्दल योग्य तो निवाडा करावा. त्यानी सांगितले पक्षांतर बंदी कायदा गोव्यातील राजकीय घडामोडी मुळेच अस्तित्वात आला, संसदीय सचिव पदे गोव्यातील घडामोडी मुळेच रद्द झाली आणि आता राज्य निवडणूक आयुक्त हे स्वतंत्र असावेत हा निवाडा ही गोव यामुळे देशाला मिळाला. गोवा अशा कारणांमुळे बदनाम झालेला आहे आणि याला सर्वस्वी भाजपचे सरकार जबाबदार आहे.

संबंधित बातम्या