सासष्टीत नऊ महिन्यांत अपघाताचे 15 बळी

सासष्टीत वाढलेल्या पर्यटनामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्याही वाढली आहे. पर्यटक रस्ता अवगत नसतानाही ‘रेंट बाईक’ भरधाव ये-जा करतात. त्यामुळेही अनेक अपघात होतात.
सासष्टीत नऊ महिन्यांत अपघाताचे 15 बळी
due to accidents 15 casualties in nine months in SalceteDainik Gomantak

सासष्टी: सासष्टी (Salcete) तालुक्यात गेल्या नऊ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात (Accidents)15 जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्याशिवाय झालेल्या किरकोळ अपघातात चालकांबरोबर अनेक पादचारीही जखमी झालेले आहेत. सासष्टी तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या अपघातांचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेले दिसून येत आहे.

सासष्टी तालुक्यात मडगाव, फातोर्डा, मायणा कुडतरी, कुंकळ्ळी आणि कोलवा पोलिस स्थानक येत असून सासष्टी तालुक्यातील या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या नऊ महिन्यात झालेल्या अपघातात एकूण पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. सासष्टी तालुक्यातील सर्व पोलिस ठाण्यात 36 च्या वर अपघात झाले आहेत.सासष्टी तालुक्यात गेल्या वर्षीची तुलना केल्यास सुरुवातीच्या नऊ महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

due to accidents 15 casualties in nine months in Salcete
डिचोलीत वॉकिंग ट्रॅकवर पसरतोय अंधार

कोलवा व कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात प्रत्येकी 4जण मृत्यूमुखी पडले असून मडगावमध्ये2, मायणा कुडतरीमध्ये 3 आणि फातोर्डा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सासष्टी तालुक्यात झालेल्या 36 आपघातांमध्ये एकूण 45 जणांचा जखमी झाले आहे. पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दारूच्या नशेच्या वाहन चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईत युवा जास्त आढळून आले आहे.

वाहतुकीत शिस्त हवी

सासष्टीत वाढलेल्या पर्यटनामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्याही वाढली आहे. पर्यटक रस्ता अवगत नसतानाही ‘रेंट बाईक’ भरधाव ये-जा करतात. त्यामुळेही अनेक अपघात होतात. त्यांच्यावर निर्बंध यायला हवे. वाहतुक नियमांचे पालन केले जात नाही. बेशिस्त वाहतुकीमुळे नाहक बळी जाण्याचे प्रकार वाढत आहेत. यासंबंधीत पोलिस खात्याने त्वरित कारवाई करायला हवी, अशी स्थानिकांची मागणी आहे.

due to accidents 15 casualties in nine months in Salcete
फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दोन वेगवगेळ्या अपघातांत दोघे ठार

वाहतूक नियमांचे उल्लंघन

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करुन स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट व सिट बॅल्टचा वापर करणे आवश्यक आहे. वाहन चालक नियमांचे उल्लंघन करुन दारुच्या नशेत तसेच अतिवेगाने वाहन चालवीत असल्यामुळे अपघात होतात. तर सुरक्षेचा विचारही न केल्याने अनेकवेळा जीवही गमवावा लागत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com