Waste Water In Vasco: वास्कोत घाणीचे साम्राज्य! इमारतींच्या सांडपाण्याची घाण उघड्यावर

रोगराई पसरण्याची येथील नागरिकांनी भिंती व्यक्त केली असून संबंधितांनी यावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
दत्तवाडी ओरुले येथे उघड्यावर सोडण्यात आलेले सुशीला संकुलातील सांडपाणी.
दत्तवाडी ओरुले येथे उघड्यावर सोडण्यात आलेले सुशीला संकुलातील सांडपाणी.Dainik Gomantak

वास्को: ओरुले वास्को येथे सुशिला संकुल या इमारतींचे सांडपाण्याची घाण येथील उघड्यावर असलेल्या गटारमध्ये सोडत असल्याने या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रोगराई पसरण्याची येथील नागरिकांनी भिती व्यक्त केली असून संबंधितांनी यावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

(Due to dumping in open drains area became polluted vasco)

दत्तवाडी ओरुले येथे उघड्यावर सोडण्यात आलेले सुशीला संकुलातील सांडपाणी.
53rd IFFI 2022: इफ्फी 2022 मध्ये प्रकाशन विभागाने आणला साहित्यिक खजिना

दत्तवाडी ओरुले वास्को येथे पाच वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या सुशिला संकुल या इमारतीतील सांडपाणी उघड्यावर सोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सदर सांडपाणी सकाळी व संध्याकाळच्या वेळी सोडले जाते.

त्यामुळे या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घाण मुद्दामहून सोडली जाते असा दावा येथील लोकांनी केला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना नाक दाबून दिवस काढावे लागतात.तसेच दोन वेळचे अन्न पोटात घालतानासुद्धा नाकीनऊ येत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

दत्तवाडी ओरुले येथे उघड्यावर सोडण्यात आलेले सुशीला संकुलातील सांडपाणी.
Vasco Illegal Hotel: धक्कादायक! वास्को येथील देव दामोदर ट्रस्टच्या जागेत परप्रांतीयने थाटले बेकायदेशीर हॉटेल

दरम्यान संबंधीत अधिकाऱ्यांनी, आरोग्य खाते, पालिकेने सदर ठीकाणी भेट देऊन सांडपाणी सोडत असलेल्या सदर सुशिला संकुल इमारतीतील लोकांवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान या ठीकाणी दत्त मंदिर असून थोड्याच दिवसात दत्त जयंती उत्सव याठीकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. तत्पूर्वी या ठीकाणी सांडपाणी सोडणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com