Covid-19: केरळचा सक्रिय दर गोव्यासाठी ठरू शकतो चिंतेचा विषय

केरळीयन नागरिकांचीगोव्यात मोठ्या प्रमाणात ये-जा
Covid-19: केरळचा सक्रिय दर गोव्यासाठी ठरू शकतो चिंतेचा विषय
Covid-19Dainik Gomantak

पणजी: केरळ (Kerala) येथील कोरोना (Covid-19) सक्रिय होण्याचे प्रमाण हे 5.9 टक्के आहे. राज्यात (Goa) विविध रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी केरळीयन आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांची ये-जा मोठी असल्याने राज्यासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सध्या कोरोनाचा सक्रिय रुग्णांचा दर कमी आहे. आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 18 वर्षांखालील 70 टक्के मुलांना कोरोना होऊन गेला आहे. मात्र त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. तरीही केरळ राज्यातील सक्रिय रुग्णांचा दर हा 5.9 टक्के असून तिथे 2 लाख 22 हजार 815 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात विविध कारणाने केरळीयन नागरिकांची मोठी ये-जा असते.

Covid-19
Goa: वेस्टर्न बायपास रस्ता बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

यात रुग्णालयातील नर्स, कर्मचारी, विविध आस्थापनातील कर्मचारी आणि कामगार आणि पर्यटक यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर तपासणीचा ताण कायम आहे. केरळमधून सरळ रेल्वेची व्यवस्था असल्याने सर्व रेल्वे स्थानकांवर तपासणी अधिक कडक करणे गरजेचे आहे, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले आहे.

एसओपी पाळायला हवी

केरळीयन प्रवाशांनी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे अनिवार्य आहे. शिक्षण आणि कामासाठी येणाऱ्यांना पाच क्वारंटाइन अनिवार्य आहे. त्यानंतर आरटीपीसीआर करूनच कामावर हजर राहवे, असा आदेशही सरकारने काढला आहे. सर्व यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे, असे डॉ. शेखर साळकर म्हणाले.

Covid-19
Goa Curfew: केरळमधून गोव्यात येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे

मृत्यू नाही; 54 नवे रुग्ण

कोरोनामुळे सोमवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. ही राज्यासाठी दिलासादायक बाब ठरली. सोमवारी 3 हजार 341 चाचण्या करण्यात आल्या त्यातून 54 नवे रुग्ण आढळून आले. तिघांना डिस्चार्ज देण्यात आला तर 9 जणांना दाखल करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com