गोमंतकीय नागरिकांना बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’

गोव्यात एका युनिटमागे 5 ते 10 पैशांची वाढ, आठ दिवसांत अधिसूचना जारी
electricity
electricityDainik Gomantak

पणजी: महागाईने त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना वीज दरवाढीचा (Electricity) ‘शॉक’ बसणार आहे. ‘वीजपुरवठा कमी असल्याने दरवाढ करावीच लागेल. दरवाढीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी गेली असून फक्त अधिसूचना बाकी आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून किमान 5 ते 10 पैशांनी प्रति युनिटमागे वाढ होईल’ अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिली. (Goa power supply)

ढवळीकर म्हणाले की, ‘राज्याला होणारा वीज पुरवठा कमी आहे. त्यामुळे सरकारने उद्योगांसाठी वीज खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यापाठोपाठ ग्राहकांकडून वापरले जाणाऱ्या वस्तूंही वाढत असल्याने वीज दरवाढीशिवाय पर्याय नाही. ग्राहकांच्या वीजबिलामध्ये प्रति युनिटमागे कमाल 10 पैशांपर्यंत वाढ होईल व त्यासंदर्भातची अधिसूचना येत्या

electricity
कसिनोंच्या शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ

आठ दिवसात खात्यातर्फे काढली जाईल.’आठ दिवसात खात्यातर्फे काढली जाईल.’

राज्य सरकारला संयुक्त वीज नियमन अनेकदा दरवाढ सुचविली होती. मात्र, कोरोना संकट व विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल यामुळे मागील सरकारने निर्णय स्थगित ठेवला होता. दरम्यान, वीज खरेदीमध्येही होणारे नुकसान सोसले होते. मात्र, अखेर हे नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने आयोगाने केलेल्या सूचनेनुसार ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी झाडे पडून वीज खात्याच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन झळ बसते. अजूनही भूमिगत वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले नाही. ही दरवाढ केली नसती तर आयोगाने इतर कामांना परवानगी दिली नसती. वीज खात्यामध्ये वीज साहित्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेक कामांच्या फाईल्स हातावेगळ्या केल्या आहेत. प्रति युनिटमागे अधिकाधिक 10 पैसे त्यामुळे वीज बिल दरात मोठासा फरक पडणार नाही.

electricity
'दैनंदिन कचऱ्यावर न होणारी प्रक्रिया हेच सोनसोड्याचे मुख्य दुखणे'

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन अनेक भागात वीज साहित्याची हानी झाली आहे. आधीच खात्याकडे वीज साहित्याची कमतरता आहे. त्यातच या नुकसानीमुळे ही वीज दरवाढ क्रमप्राप्त होते. पावसाळ्यातील होणारी हानी लक्षात घेऊन खात्याने वीज साहित्याच्या खरेदीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अजूनही काही भागात वीज पुरवठा अनियमित आहे व तेथील काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com