Goa Crime: पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोलवाळ येथील चोरी उघडकीस

काणकोण पोलीस ठाणाच्या हद्दीतून मोटारीची झाली होती चोरी
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

सध्या गोव्यात चोरीच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि गोवा प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क झाले आहे. गोवा पोलिसांच्या दक्षतेमुळे अनेक चोरीच्या घटनांचा शोध घेणे शक्य झाले आहे. दरम्यान पोलीस विभागाकडून राज्यात झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी सादर केली गेलीय. यात परप्रांतीय गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर असून झोपडपट्टी रहिवासीही सामील असल्याचे समोर आले आहे.

नुकतीच कोलवाळ येथे चोरीची घटना उघडकीस आलीय. कोलवाळ समुद्रकिनारी चोरीची मोटार विकण्याचा प्रयत्न करताना चार तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेविषयी अशी माहिती प्राप्त झालीय की, काणकोण पोलीस ठाणाच्या हद्दीतून बोट चालवण्यासाठीची मोटार चोरीला गेल्याची घटना घडली होती.

Goa Crime
Goa News: म्हादई, कोळसा हाताळणीमुळे आता ‘करा वा मरा’ची वेळ

दरम्यान आज कोलवाळ समुद्र किनाऱ्यावर ही चोरीची मोटार विकण्याचा प्रयत्न करताना चार तरुणांना अटक करण्यात आलंय. तसेच या मोटार वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे वाहनही जप्त करण्यात आले आहे. सविस्तर माहिती थोड्याच वेळात..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com