पेडणे येथे दुर्गा मल्टीपर्पज पतसंस्था सुरू

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

 कोरोना महामारीमुळे पूर्णपणे अर्थ व्यवस्था कोसळली आहे. सगळीकडे अनेक उद्योग बंद पडले आहेत. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. पतपेढ्या या स्थानिक लोकांच्या पाठबळावर उभ्या राहिल्या आहेत.

पेडणे: कोरोना महामारीमुळे पूर्णपणे अर्थ व्यवस्था कोसळली आहे. सगळीकडे अनेक उद्योग बंद पडले आहेत. अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे. पतपेढ्या या स्थानिक लोकांच्या पाठबळावर उभ्या राहिल्या आहेत. बॅंकापेक्षा अशा पथपेढ्यांना लोकांच्या समस्यांची जास्त जाण असल्याने कोव्हिडच्या या अशा परिस्थितीत पतपेढ्यांनी स्थानिक उद्योजकांना अर्थ साहाय्य करून विद्यमान परिस्थितीतून बाहेर येण्यास प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका श्रध्दा नाईक माशेलकर यांनी येथे बोलताना सांगितले.

येथील दुर्गा मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडचे त्यांचा हस्ते फीत कापून तर खास निमंत्रित विर्नोडाचे माजी सरपंच कृष्णा परब यांच्या हस्ते उद्‌घाटन झाल्यानंतर त्या प्रमुख पाहुण्या या नात्याने सौ. नाईक माशेलकर बोलत होत्या. व्यासपीठावर कृष्णा परब, रामनाथ सावंत, रश्मी तांबोसकर व विश्वनाथ नागोजी आदी मान्यवर उपस्थित होते.

कृष्णा परब म्हणाले, दुर्गा मल्टीपर्पजचे जे हे रोपटे लावण्यात आली आहे. त्याचा वटवृक्ष होऊन त्याच्या छायेचा लोकांना लाभ व्हावा. यावेळी संस्थेच्या माहिती पुस्तिकेचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

रामनाथ सावंत यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आदिती सामंत, रश्मी तांबोसकर यांनी व्यासपीठावरील मान्यवरांनी स्वागत केले. सौ.पल्लवी परब यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करुन आभार मानले.

संबंधित बातम्या