गाकुवेध फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दुर्गादास गावकर यांचे निधन

गाकुवेध फेडरेशन (Gakuvedh Federation) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दुर्गादास गावकर (65) यांचे आज आकस्मिक निधन झाले. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
गाकुवेध फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष दुर्गादास गावकर यांचे निधन
Durgadas GavkarDainik Gomantak

मडगाव: गावडा, कुणबी व वेळीप या तीन जमातींना अनुसूचित जमातींचा दर्जा मिळावा यासाठी मोठे योगदान दिलेले गाकुवेध फेडरेशन (Gakuvedh Federation) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दुर्गादास गावकर (65) यांचे आज आकस्मिक निधन झाले. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने गोमेकॉ इस्पितळात (Gomeco Hospital) आणण्यात आले पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्यामागे पत्नी व पुत्र असा परिवार असून आजच त्यांच्यावर धुळापी खोर्ली (तिसवाडी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गावकर हे गोमंत गौड मराठा या संघटनेचेही माजी अध्यक्ष होते. अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत यासाठी त्यांनी मोठे कार्य केले होते. त्यांच्या निधनाने गोव्यातील एसटी चळवळीने आपला एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला अशी प्रतिक्रिया गाकुवेध फेडरेशनचे सरचिटणीस रुपेश वेळीप यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com