Goa Trip: गोव्यातील 'या' इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सला नक्की भेट द्या

गोव्यात अनेक सुंदर आणि अद्भुत गोष्टी आहेत, परंतु गोव्याने ऑफर केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे फ्रेंडली रिसॉर्ट्स जे तुम्हाला निसर्गाशी आणि स्वत:शी जोडण्यात मदत करते.
गोव्यातील 'या' पाच इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सला नक्की भेट द्या
गोव्यातील 'या' पाच इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सला नक्की भेट द्या Instagram/@palmtreesgoa

पर्याटनाच्या दृष्टीने व्यापक आणि क्षेत्रफळानुसार भारताचे सर्वात लहान राज्य म्हणून गोव्याची (Goa) ओळख आहे; तसेच लोकसंख्येनुसार देशातील चौथे सर्वात लहान राज्य असून, सुंदर समुद्र किनारे आणि प्रसिद्ध वास्तुकलेसाठी गोवा (Goa) जगभरात ओळखला जातो. गोव्यातील नाइट लाईफ (Night Life) असो किंवा बीच लाईफ(Beach) असो किंवा मग प्रेक्षणीय स्थळे असो गोवा वैविध्यपूर्ण संस्कृतीने बनले आहे.गोवा निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. यामुळे निसर्गप्रेमी येथे आवर्जून भेट देण्यासाठी येतात. चला तर माह जाणून घेवूया गोव्यातील पाच इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सलाबद्दल जिथे तुम्ही स्वत:शी आणि निसर्गाची नात जुळवू शकता.

Bhakti Kutir , south Goa

इको-फ्रेंडली (Eco-friendly) रिसॉर्ट्सच्या यादीत भक्ति कुटीर यांचे नाव येते. हे निसर्गरम्य रिसॉर्ट पालोलेम बीचपासून पाच मिनिटांच्या अंतरावर उष्णकटीबंधीय जंगलात दोन एकर जागेवर आहे. भक्ती कुटीर हे कानाकोना क्षेत्रातील सर्वात जूने आणि सर्वात प्रस्थापित रिसॉर्टपैकी एक आहे आणि ते दीर्घकाळापासून पर्यटकांसाठी आश्रयस्थान आहे.

येथे राहण्यासाठी एकमजली किंवा दुमजली बांबू आणि लाकडी कबाना स्टाइल सुंदर झोपड्या आहेत . येथे राहण्यासाठी प्रती रात्र अंदाजे1700 रुपये द्यावे लागतात

Elsewhere, North Goa

उत्तर गोव्यात 500 यार्ड पसरलेल्या चार पारंपारिक घरांसह, मालमत्ता एका बाजूला अरबी समुद्र आणि इतर तीन बाजूला ऑटर क्रिकने वेढलेली आहे. शतकानुशतके जून कॉटेज आधुनिक सुविधांनी भरलेले आहेत. येथे राहण्यासाठी सुंदर असे कॉटेज आहेत. येथे पर्यटनाच्या सीझननुसार राहण्याचे रेट बदलत असतात.

The Palm Tree South Goa

पाम ट्री हा एक आयुर्वेदिक वारसा आहे जो शहराच्या गजबजाटापासून दूर आहे. दक्षिण गोव्यातील काणकोण येथे वसलेले असून, पाम ट्री हे पटनेमच्या सुंदर नारळाच्या झाडांमध्ये नटलेले एक निर्मळ आणि शांत इको- रिसॉर्ट आहे. तुम्हाला जर गोव्याचा पूर्णपणे अस्सल अनुभव घ्यायचा असेल तर हे एक योग्य ठिकाण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com