म्हापसा बाजारपेठेतील अर्थचक्र मंदावले

तुषार टोपले
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर प्रत्येक शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले.

म्हापसा:  कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर प्रत्येक शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल झाले. म्हापसा बाजारपेठेतील व्यापारी अर्थचक्र मध्येच मंदावल्यामुळे चिंतेत पडलेले आहे. कोविड१९ मुळे ग्राहक बाजारपेठेत येत नसल्यामुळे आर्थिक चक्र मंदावले असले तरी शहराच्या बाहेर कोरोनाच्या काळात बाजाराचा विस्‍तार झाला असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन व्यवसाय करणाऱ्या व्यापाराकडे आर्थिक चलती चालू आहे.

मागच्या पाच महिन्यात म्हापसा नगरपालिकेने कोविड-१९मुळे फेरीविक्रेत्यांना सगळ्याच ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. 

नेहमीच्या फेरी विक्रेत्यांना आठवड्यासाठी बसण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील फेरीविक्रेत्याची संख्या कमी झाली आहे. सामान्य ग्राहक फेरीविक्रेत्याकडून खरेदी करण्यास पसंती देतो तसेच बिगर गोमंतकीय ग्राहक रस्त्यावरच खरेदी करत असतो त्यामुळे या फेरीविक्रेत्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्राहक नसल्यामुळे फेरी विक्रेत्याच्या हातात पैसा नाही. त्यामुळे  काही फुटपाथ व्यापारी आपल्यामुळगावी निघून गेले आहे. कोरोनाच्या काळात राज्यात टाळेबंदी झाल्यानंतर काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर काही टॅक्सी, पायलट चालकांचा धंदा बंद असल्यामुळे तसेच अन्य व्यवसाय करणाऱ्यांना कोरोनाचा फटका बसल्यानंतर बहुसंख्य नागरिकांनी नवीन व्यवसायात प्रवेश केला.

घरपोच सुविधेमुळे नफ्याचे केंद्रीकरण
कडधान्याची विक्री करणारे व्यापारी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात चांगला व्यवसाय झाला मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली या व्यापाऱ्याची अर्थव्यवस्था चांगली झाली होती. त्यानंतर शहराच्या बाहेर अनेक लोकांनी कडधान्याची विक्री करणारी दुकाने, सुपर मार्केट घातल्यानंतर बाजारपेठेतील कडधान्याच्या व्यापाऱ्यांच्या ग्राहकांची संख्या निश्‍चित कमी झाली. या दोन महिन्यात या मंडळीना ग्राहकाची वाट पाहावी लागते. काही व्यापाऱ्यांनी घरपोच सेवा चालू केल्यामुळे काही व्यापाऱ्यांचे अर्थचक्र मंदावले आहे. आजच्या कोरोनाच्या महामारीत प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे ग्राहक बाजारात येणे टाळत आहे. त्यापुढे व्यापाऱ्यांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. तर शहराच्या बाहेर व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या