मर्सेसनजीक उभारले जाणार नवीन व्यावासायिक शहर; आर्थिक विकास महामंडळाची घोषणा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

जवळपास 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या मर्सेसजवळील जागेवर अनेक व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, युटिलिटी सेवा आणि खुल्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत सरकारला महसूल मिळेल. तसेच गोमंतकियांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे.

पणजी- आर्थिक विकास महामंडळाने  पणजीच्या हद्दीत व्यावसायिक शहर उभारण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचे अनावरण केले. जवळपास 2 लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या मर्सेसजवळील जागेवर अनेक व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, युटिलिटी सेवा आणि खुल्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत सरकारला महसूल मिळेल. तसेच गोमंतकियांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे.

सध्या प्लाझा या  ठिकाणी कचऱ्याचा साठा करून ठेवला जात आहे. ती जागा विकसित करून तेथे ईडीसी ‘कमर्शियल सिटी’ प्रकल्प उभारला जाणार आहे. गोमंतकीय व्यवसायिकांना तेथे स्टॉल्स घालून रोजगार उपलब्ध होईल. तसेच गोमंतकियांना संध्याकाळी विरंगुळ्यासाठीही ही जागा आकर्षणाची ठरणार आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजनेतून देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये वाढ करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या सूचनेचा विचार केला जाईल, असे ईडीसीचे अध्यक्ष सदानंद तानावाडे म्हणाले. ईडीसीमध्ये आज झालेल्या 100व्या कृती दल समितीच्या बैठकीत 64 लाभार्थ्यांच्या प्रस्तावावर २ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यटकांना आकर्षित करणे आणि रोजगार निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असणार आहे.

 

संबंधित बातम्या