राष्ट्र निर्मितीस प्रोत्साहन देणारे शिक्षण अपेक्षित: सुभाष वेलिंगकर

शिक्षक दिनानिमित्त डिचोलीच्या शिक्षा व्हिजन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात प्राचार्य वेलिंगकर (Subhash Welingkar) प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
राष्ट्र निर्मितीस प्रोत्साहन देणारे शिक्षण अपेक्षित: सुभाष वेलिंगकर
TeacherDainik Gomantak

डिचोली: शिक्षक (Teacher) हा समाजासाठी आदर्श असावा. केवळ विद्यार्थ्यांना शाळेत विद्यादान करुन अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि चांगला निकाल लागला, म्हणजे शिक्षण नव्हे, तर शिक्षकांकडून राष्ट्र आणि व्यक्ती निर्माण करणारे शिक्षण अपेक्षित आहे. दुर्दैवाने अजूनही तसे होत नाही. अशी खंत शिक्षणतज्ञ प्राचार्य सुभाष वेलिंगकर (Subhash Welingkar) यांनी व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त डिचोलीच्या शिक्षा व्हिजन संस्थेतर्फे आयोजित केलेल्या निवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात प्राचार्य वेलिंगकर प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.

Teacher
Teacher’s Day 2021: 'हे' चित्रपट शिक्षक आणि विद्यार्थी निर्मळ नात्याला उलघडतात

येथील शेट्ये सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. सुभाष जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, नगरसेवक गुंजन कोरगावकर, शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि उपाध्यक्ष डॉ.दिनेश आमोणकर (Dr. Dinesh Amonkar) उपस्थित होते. प्रमुख पाहूणे श्री. राणे यांनी यावेळी पूर्वीच्या आणि आजच्या शिक्षण पद्धतीविषयी आपले मत मांडले. शिक्षकांनी समाज घडविण्याचे आपले कार्य प्रामाणिकपणे करावे. असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहणे प्रतापसिंह राणे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते डिचोली मतदारसंघातील जवळपास 200 निवृत्त शिक्षकांचा शाल स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.

Teacher
Goa: शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांसह शिक्षक, शाळा प्रशासनासमोर आव्हान 

डॉ. दिनेश आमोणकर यांनी स्वागत केले. डॉ. चंद्रकांत शेट्ये (Dr. Chandrakant Shetty) यांनी प्रास्ताविक भाषणात शिक्षकांची महती सांगितली. समई प्रज्वलित केल्यानंतर प्रतापसिंह राणे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप धारगळकर यांनी तर सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण सावंत यांनी केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com