Goa Education : विद्यार्थ्यांचे पुस्तकांविना शिक्षण!

शाळा सुरू ; दोन महिन्यांपासून पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षाच
Goa Education Latest News
Goa Education Latest NewsDainik Gomantak

खांडोळा : शाळा सुरू होताच नवी बॅग, नवा रेनकोट, नवा गणवेश, कोऱ्या पुस्तकांचा वास, नव्या इयत्तेच्या नव्या पुस्तकांचे अप्प्रू अशा गोष्टींत विद्यार्थी रमतगमत, आनंदात अध्ययनाला सुरुवात करतात, पण गोव्यात अद्याप काही शाळांतून तिसरी, चौथीचे गणितांचे पुस्तकच मिळाले नाही. त्यामुळे पुस्तकांविनाच शाळा सुरू झाल्या आहेत.

Goa Education Latest News
CM Pramod Sawant : सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सप्टेंबरमध्ये चिंतन शिबिर

काही ठिकाणी जुन्या फाटलेल्या अर्धवट पुस्तकांवर अध्ययन, अध्यापन उरकले जात आहे, याला शिक्षण खात्याचा आंधळेपणा कारणीभूत आहे, अशी माहिती आपचे नेते नोनू नाईक यांनी दिली.

शाळा सुरू होऊन जवळ जवळ दोन महिने झाले, परंतु अद्याप गणिताचे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोचले नाही. गणित हा महत्त्वाचा विषय असून पुस्तकाशिवाय गणिताचा अभ्यास कसा करायचा? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे. काही ठिकाणी वह्यांचेही वाटप झालेले नाही. सध्या शाळांचे विलीनीकरण होणार, ही भितीही पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे. मुळात पुस्तकाविना शिक्षण व्यवस्थित होत नाही.

विद्यार्थांचे होत आहे नुकसान

खांडोळा, माशेल येथील प्राथमिक शाळेत प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर पालकवर्गातर्फे सांगण्यात आले की, चौथीचे गणित पुस्तक नाही. गावकरवाडा-खांडोळा, देऊळवाडा माशेल शाळेत पटसंख्याही शंभराच्यावर आहे. दोन्ही आदर्श शाळा आहेत, जुन्या पुस्तकांच्या आधारे शिकवणे सुरू आहे. काही विद्यार्थ्यांकडे पुस्तकच नसल्यामुळे गणित विषय पक्का होत नाही. हे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे.

शिक्षकांचे कौतुक :

गेल्यावर्षीची जुने पुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा करून घेतली असून त्या पुस्तकांच्या आधारे अध्यापन सुरू ठेवले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. काही पालकांनी झेराक्स प्रत तयार घेतली आहे. एकूणच सूज्ञ पालक व शिक्षकांनी अडचणीतूनही मार्ग काढला आहे, पण संबंधित अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com