पदभार स्वीकारल्यापासून भ्रष्टाचार बंद करण्यासाठी प्रयत्नशील- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी भष्ट्राचाराविरूध्द आवाज उठवला आहे. तसेच भ्रष्टाचार थांबवण्यासाठीही यापुढेही आपण प्रयत्न करत
राहू, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

पणजी- पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी भष्ट्राचाराविरूध्द आवाज उठवला आहे. तसेच भ्रष्टाचार थांबवण्यासाठीही यापुढेही आपण प्रयत्न करत
राहू, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

येथे आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका बैठकीनंतर ते बोलत होते. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक टंचाई असतानाही कोणतीही काटकसर न करता राज्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 2022 पर्यंत अनेक योजना राबवून गोव्याला समृध्द करण्याचा आपला मानस असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

‘सेवा ही संघटन’ या शीर्षकाखाली पक्षाचे जेष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या