‘मोपा’सह आयुष इस्पितळ उद्‍घाटनासाठी प्रयत्न : श्रीपाद नाईक

तातडीने ओपीडी सुरू करण्याचा सरकारचा विचार
Ayush Hospital Goa
Ayush Hospital GoaDainik Gomantak

पेडणे : आयुष इस्पितळाच्या 301 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोपा विमानतळ उदघाटनावेळीच याही इस्पितळाचे उदघाटन करता येईल, अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

न्याय व कायदामंत्री एस. पी. सिंघ वाघेला,पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व धारगळचे सरपंच भूषण नाईक यांच्या सोबत आयुष इस्पितळ इमारतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

Ayush Hospital Goa
'त्या' युक्रेनियन नागरिकाचा मृत्यू नैसर्गिक; शवविच्छेदनानंतर झाले स्पष्ट

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की,उदघाटन होण्यापूर्वी ओपीडी सुरु करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेगळा आयुर्वेदीक विभाग सुरु केला व तेव्हा मला आयुषमंत्रीपद मिळाले व या कालावधीत हा इस्पितळ प्रकल्प बांधण्यास सुरवात झाली.मध्यंतरीच्या काळात जमिनीच्या प्रश्नावरून प्रकल्पाचे काम जरा रखडले. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन सहकार्य केले.

कायदामंत्री वाघेला म्हणाले की, आयुर्वेदीक वैद्यकीय क्षेत्रात ऋषी मुनींनी बरेच संशोधन केले होते. आयुर्वेद देशाची देणगी आहे.

इस्पितळासाठी विदेशातही मागणी

आयुर्वेदीक उपचार ही आमची पध्दत आहे पण मध्यंतरीच्या काळात मुघल त्यानंतर ब्रिटिश,पोर्तुगीज राजवटी आल्या आमच्या संस्कृती बरोबरच आमची आयुर्वेदीक उपचार पध्दतीही त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला.पण वैद्यांनी ही उपचारपध्दती टिकवली. आयुर्वेदीक इस्पितळ सुरु करण्यासाठी विदेशातूनही मागणी येत आहे. विदेशींना योगा शिकता येईल,असे मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com