राज्यात ईदसाठी उत्साहाचे वातावरण 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

राज्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सणाचे स्वरूप लहान असणार आहे

पणजी: राज्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने सणाचे स्वरूप लहान असणार आहे. पाच वेळेची नमाज पढल्यानंतर या ईदला मुस्लिम बांधव जगाला आणि देशाला कोरोनाच्या या संकटापासून वाचविण्यासाठीची प्रार्थना करणार आहेत.

काहीजण यादिवशी गरिबांना पोटभर खाऊ घालतात, त्यामुळे त्यांच्यात आता या जेवणासाठीचा बाजार भरण्याची तयारी सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांच्या घरी मांसाहारी जेवणाचा बेत असल्याने त्याची तयारीही घराघरात होत आहे.
 

संबंधित बातम्या