साडेआठ लाखांचा ड्रग्ज जप्त, तिघांना अटक 

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

गोवा गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने तिघाजणांना अटक करून सुमारे ८.५ लाख किंमतीचे एमडीएमए ड्र्ग्ज जप्त केला.

पणजी : गोवा गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने तिघाजणांना अटक करून सुमारे ८.५ लाख किंमतीचे एमडीएमए ड्र्ग्ज जप्त केला. अटक केलेल्यांची नावे आयन अली खान (हैद्राबाद), वेलेंटीन डेंझेल परेरा (मुंबई) व स्ट्रोम केनेडी फर्नांडिस (मुंबई) अशी आहेत.

अलिशान गाडीतून हे तिघे फिरत असताना पोलिसांनी त्यांना अडविले व केलेल्या चौकशीत त्यांनी हा ड्रग्ज गाडीमध्ये लपविला होता. त्यामुळे ही गाडीही जप्त करण्यात आली आहे. नाताळ ते नववर्षाच्या पूर्वसंध्येपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात असल्याने हा ड्रग्ज विक्रीसाठी ते गोव्याबाहेरून घेऊन आले होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या